ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या वूमन्स टीम इंडिया एची हारकीरीच सुरुच आहे. टीम इंडियाने 3 सामन्यांची टी 20 मालिका गमावली. त्यानंतर सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही ऑस्ट्रेलिया वूमन्स ए ने टीम इंडियाचा धुव्वा उडवला आहे. ऑस्ट्रेलियाने या विजयासह टी20i नंतर वनडे सीरिजही जिंकली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 219 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 58 बॉलआधी 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 40.2 ओव्हरमध्ये 221 धावा करुन 8 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
केटी मॅक आणि मॅडी डार्क या सलामी जोडीने ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. या दोघींनी 131 धावांची भागीदारी केली. त्यानंतर केटी मॅक 78 बॉलमध्ये 5 चौकारांसह 68 धावांची खेळी केली. त्यानंतर मॅडी डार्क आणि चार्ली नॉट या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 38 धावा जोडल्या. चार्ली नॉट 23 बॉलमध्ये 9 रन्स करुन आऊट झाली. मॅडी डार्क हीने कॅप्टन ताहिला मॅकग्रा हीच्यासह तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 52 धावांची विजयी भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने या दुसऱ्या विजयासह मालिकाही जिंकली. ताहिला मॅकग्रा हीने नाबाद 32 धावा केल्या. तर मॅडी डार्कने 115 चेंडूत 7 चौकारांसह 106 धावांची शतकी खेळी केली. तर टीम इंडियाकडून सायली सातघरे आणि तनुजा कंवर या दोघींनी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं.टीम इंडियाने 48 ओव्हरमध्ये ऑलआऊट 218 धावा केल्या. टीम इंडियासाठी राघवी बिष्ट, तेजल हसबनीस आणि शुभा सतिश या तिघींनी सर्वाधिक धावा केल्या. या तिघींनी अनुक्रमे 70, 63 आणि 24 अशा धावा केल्या. तर इतरांना काही विशेष करता आलं नाही. ऑस्ट्रेलियासाठी मॅटलान ब्राउन, चार्ली नॉट आणि निकोला हॅनकॉक या तिघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने वनडे सीरिजही जिंकली
🇦🇺 Australia A seals the One-Day series 2-0!
Maddy Darke’s unbeaten 106 powers Australia A to a comfortable 8 Wicket victory. #CricketTwitter #AUSvIND pic.twitter.com/pBIeQz5hgx
— Female Cricket (@imfemalecricket) August 16, 2024
वूमन्स ऑस्ट्रेलिया ए प्लेइंग ईलेव्हन : ताहलिया मॅकग्रा (कॅप्टन), केटी मॅक, मॅडी डार्क, चार्ली नॉट, निकोल फाल्टम, टेस फ्लिंटॉफ, मॅटलान ब्राउन, केट पीटरसन, टायला व्लेमिंक, निकोला हॅनकॉक आणि ग्रेस पार्सन्स.
वूमन्स इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : मिन्नू मणी (कर्णधार), श्वेता सेहरावत, प्रिया पुनिया, शुभा सतीश, तेजल हसबनीस, राघवी बिस्त, शिप्रा गिरी, तनुजा कंवर, सायली सातघरे, शबनम शकील आणि सोप्पधंडी यशश्री.