धर्मशाळा | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशनंतर न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा हा सलग पाचवा विजय ठरला. टीम इंडियाने 274 धावाचं आव्हान हे 48 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. विराट कोहली याने टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. विराटने टीम अडचणीत असताना डाव सावरला. विराटने सर्वात जास्त 95 धावा केल्या. विराटचं शतक हुकलं. मात्र तोवर त्याने आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. विराटच्या खेळीमुळे टीम इंडियाने न्यूझीलंडवर वर्ल्ड कपमध्ये 2003 नंतर पहिल्यांदा विजय मिळवला.
विराटच्या या विराट खेळीमुळे टीम इंडियाची गेल्या 20 वर्षांची प्रतिक्षा संपली. भारतीय संघाच्या विजयानंतर कॅप्टन रोहित शर्मा याने डगआऊटमध्ये विराट कोहली याला घट्ट मिठी मारली. या दोघांची मिठी तब्बल 4 कोटी 30 लाख लोकांनी लाईव्ह पाहिली. या दोघांच्या मिठीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
टीम इंडियाच्या विजयात विराट कोहली याने सिंहाचा वाटा उचलला. टीम इंडियाचा डाव चांगल्या सरुवातीनंतर मिडल ऑर्डरमध्ये अडखळला होता. मात्र विराटने संयम दाखवत एक बाजू चिवटपणे लावून धरली. तसेच जेव्हा संधी मिळेल तेव्हा विराटने फटकेबाजी केली. विराटने अर्धशतक केलं. त्यानंतर विराटने विकेट्स जात असतानाही स्वत:वरचं नियंत्रण गमावलं नाही. त्याने सिंगल, डबल, फोर मारत स्कोअरबोर्ड हलता ठेवला. टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवलं.
आता विराटला बांगलादेशप्रमाणे न्यूझीलंड विरुद्धही विनिंग शॉट मारुन सलग दुसरं शतक करण्याची संधी होती. मात्र विराट 95 धावांवर आऊट झाला. विराटने 104 बॉलमध्ये 8 चौकार-2 षटकारांच्या मदतीने 91.35 च्या स्ट्राईक रेटने 95 धावा केल्या.
विजयानंतरचा भावूक क्षण
The winning hug between Virat Kohli and Rohit Sharma.
– The King and the Hitman! pic.twitter.com/Wn0bDlP8ex
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 22, 2023
व्हीडिओ व्हायरल
#INDvsNZ
A splendid win with a boundary by #Jadega.
4.3 cr #GOAT𓃵 #ViratKohli𓃵 #Shami #siraj #RohitSharma #SuryakumarYadav pic.twitter.com/9ZaSWMwwdp— Abdul Salam (@abdulSalamveer) October 22, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेन्ट बोल्ट.