WITT: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी टीव्ही 9 च्या कार्यक्रमात मन केलं मोकळं, क्रिकेटपटू ते नेतेपदापर्यंतचा प्रवास उलगडला

| Updated on: Feb 25, 2024 | 9:03 PM

देशातील सर्वात मोठं नेटवर्क असलेल्या टीव्ही 9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी या कार्यक्रमाचं कौतुक केलं. तसेच क्रीडाक्षेत्रातील प्रगतीचा पाढा वाचला. तसेच नेतेपदापर्यंतचा प्रवास उलगडला.

WITT: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी टीव्ही 9 च्या कार्यक्रमात मन केलं मोकळं, क्रिकेटपटू ते नेतेपदापर्यंतचा प्रवास उलगडला
Follow us on

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या टीव्ही ९ नेटवर्कच्या ‘व्हॉट्स इंडिया थिंक्स टुडे’ कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी क्रीडाक्षेत्रात अलौकिक कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी क्रीडाक्षेत्रात होत असलेल्या योजनांचा पाढा वाचला. तसेच वैयक्तिक आयुष्यातील लोकांना माहिती नसलेल्या गोष्टीही सांगितल्या. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितलं की, “मला क्रिकेटर व्हायचं होतं. पण माझ्या वडिलांची इच्छा सैन्यदलात पाठवण्याची होती. पण मी आता नेता झालो आहे.” असं सांगताना त्यांनी क्रीडाविश्वातील प्रगतीचा आलेख वाचला. “मला क्रिकेट सोडायचे नव्हते, पण कौटुंबिक परिस्थितीमुळे अशी झाली की मला खेळ सोडावा लागला. वयाच्या 25 व्या वर्षी मी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झालो. त्यानंतर वयाच्या 26 व्या वर्षी आम्ही धर्मशाला येथे क्रिकेट स्टेडियम बनवले.”, असं अनुराग ठाकुर यांनी सांगितलं.

“पहिल्यांदाच आपल्या देशाला एशियन गेम्समध्ये १०० हून अधिक मेडल मिळाले. आज आपण आपलं काम करत आहोत आणि त्याचं फळ मिळताना दिसत आहे. यापूर्वी खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पण आज खेलो इंडियासह इतर योजनांच्या माध्यमातून खेळाडूंचा खर्च उचलला जात आहे.”, असं अनुराग ठाकुर यांनी सांगितलं. “देशात खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून बऱ्याच योजना राबवल्या जात आहेत. खेलो इंडियासहीत आज सरकार बऱ्याच योजना राबवत आहेत. यात खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळाला असून त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.”, असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितलं.

“एवढेच नाही तर ६ लाख रुपये वेगळे दिले जातात. आमच्या सरकारने ६ हजारांहून अधिक क्रीडा केंद्रे बांधली आहेत आणि ही फक्त एक सुरुवात आहे. राज्य सरकारकडून मदत मिळाल्यास आपण यात मोठी झेप घेऊ शकतो.”, असं क्रीडामंत्री म्हणाले.

“आम्ही आमच्या बाजूने कोणतीही कसर सोडू नये. खेळाडूंना जे काही करायचे आहे ते ते करतात आणि आम्हाला जे काही करायचे आहे ते मी करेन. खेलो इंडिया अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी ५ लाख रुपये आणि पॉकेटमनीसाठी १ लाख रुपये मिळतात. कारण खेळाडूंना अधिक चांगले प्रशिक्षण देता येते. आज देशात 1075 केंद्रे उघडली आहेत. राज्य सरकारांनी थोडी मदत केली तर भारतासारख्या देशात २० राज्यांनीही चांगली कामगिरी केली तर आपण पुढे जाऊ शकतो.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.