आयपीएल 2024 मधील 55 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सुरू आहे. पलटणच्या घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना होत आहे. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने याने टॉस जिंकला. प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतलाय. आजच्याा हैदराबादविरूद्धच्या सामन्यामध्ये मुंबईच्या प्लेइंग 11 मध्ये एका युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे. या खेळाडूचं नाव अंशुल कंबोज आहे.
अंशुल कंबोज याने मुंबईकडून पदार्पण केलं आहे. तो मुळचा हरियाणा येथील कर्नालमधील आहे. मुंबईने अंशुल याला त्याच्या मूळ किमतीमध्ये म्हणजेच 20 लाख रूपयांने ऑक्शनमध्ये खरेदी केलं होतं. अंशुल वेगवान गोलंदाज असून त्याने हरियाणाकडून खेळताना अष्टपैलू कामगिरी बजावली आहे. आतापर्यंत त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 13 सामने खेळताना 24 विकेट घेतल्या असून 284 धावा केल्या आहेत. अंशुल हा भारताच्या अंडर 19 संघातूनही खेळला आहे.
🚨 Toss 🚨@mipaltan win the toss and will bowl first against @SunRisers
Follow the Match ▶️ https://t.co/iZHeIP3ZRx#TATAIPL | #MIvSRH pic.twitter.com/6wwk8e5nmU
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2024
अंशुल कंबोज याच्यासमोर यंदाच्या सीझनमधील सर्वात धोकादायक फलंदाजांची फळी असलेल्या हैदराबाग संघाचं आव्हान असणार आहे. मात्र आपल्या पहिल्या सामन्यात कंबोज काही चमत्कार करून दाखवतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सनरायझर्स हैदराबादचा प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, अंशुल कंबोज, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.