मुंबई : भारत आणि बांगलादेशमधील पहिल्या टी-20 सामन्यामध्ये (India vs Ban First T-20 Match) महिला भारतीय संघाने विजयाचा श्रीगणेशा केला आहे. शेर ए बांगला स्टेडिअममध्ये झालेला सामना भारताने 7 विकेट्सने जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे सहज विजय मिळवला. हरमनप्रीतने नाबाद अर्धशतक करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीतने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेश संघाला 20 षटकात 114 धावा करता आल्या, यामध्ये शोर्ना अक्टर हिने सर्वाधिक नाबाद 28 धावा केल्या. त्यासोबतच शोभना मोस्तरी 23 धावा आणि शाठी राणीने 22 धावा केल्या. भारताकडून पूजा वस्त्राकर, मिन्नू मणी आणि शफाली वर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
टीम इंडिया या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यावर खराब सुरूवात झाली. पहिल्याच ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर शफाली वर्मा आऊट झाली. त्यानंतक जेमिमाह रॉड्रिग्सही 11 धावांवर माघारी परतली. त्यामुळे संघावर काहीसा दबाव आला होता.
मैदानात हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना या दोघींनी डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. संघाला विजय जवळ आल्यावर मानधना 38 धावांवर माघारी परतली. त्यानंतर यास्तिका भाटिया आणि हरमनप्रीत यांनी संघाचा विजय साकारला. हरमनप्रीतने 35 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या, यामध्ये दोन सिक्सर आणि सहा चौकार मारले.
आजच्या सामन्यामध्ये बरेड्डी अनुषा आणि मिन्नू मणी यांनी टी-20 मध्ये पदार्पण केलं. आदिवासी पाड्यातील मणी आणि मजुराची मुलगी असलेल्या अनुषा आता टीम इंडियाचं प्रतिनिधित्त्व करताना दिसतील.
That’s that from the 1st T20I.
A convincing 7-wicket win in the first T20I over Bangladesh and #TeamIndia take a 1-0 lead in the series.
Captain @ImHarmanpreet (54*) hits the winning runs as we win with 22 balls to spare.
Scorecard – https://t.co/QjTdi2Osrg #BANvIND pic.twitter.com/zeSveT5nHF
— BCCI Women (@BCCIWomen) July 9, 2023
बांगलादेश महिल (प्लेइंग इलेव्हन): निगार सुलताना (w/c), सलमा खातून, शमीमा सुलताना, नाहिदा अक्टर, रितू मोनी, शोर्ना अक्टर, मारुफा अक्टर, शोभना मोस्तरी, शाठी राणी, सुलताना खातून, राबेया खान
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (C), यास्तिका भाटिया (W), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, बरेड्डी अनुषा, मिन्नू मणी