मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं आहे. 23 फेब्रुवारील गतविजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता दिल्ली कॅपिटल्स संघ आमनेसामने येणार आहे. या सामन्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षी अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा दिल्ली कॅपिटल्स काढणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. पहिल्या पर्वातील अंतिम फेरीचा सामना अतितटीचा झाला होता. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीने 20 षटकात 9 गडी गमवून 131 धावा केल्या आणि विजयासाठी 132 धावांचं आव्हान दिलं. मुंबई इंडियन्सने हे आव्हान 3 गडी गमवून 19.3 षटकात पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्स आणि 3 चेंडू राखून विजय झाला. मुंबई इंडियन्सकडून नॅट स्कायव्हर ब्रंट 55 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या होत्या. तर कर्णधार हरमनप्रीत कौर हीने 39 चेंडूत 37 धावा केल्या होत्या.
एलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन*, लॉरा हॅरिस, मारिझान कॅप, मेग लॅनिंग, मिन्नू मणी, पूनम यादव, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया, तितास साधू
नवीन खरेदी: एनाबेल सदरलँड, अपर्णा मंडल, अश्विनी कुमारी
अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेली मॅथ्यू, हुमैरा काझी, इसाबेल वोंग, जिंतिमनी कलिता, नताली स्कायव्हर, पूजा वस्त्राकर, प्रियांका बाला, सायका इशाक, यास्तिका भाटिया
नवीन खरेदी: शबनीम इस्माईल, अमनदीप कौर, एस सजना, फातिमा जाफर, कीर्थना बालकृष्णन