WPL 2024 : वुमन्स प्रीमियर लीगचं बिगुल वाजलं, 23 फेब्रुवारीपासून असं आहे संपूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक

| Updated on: Jan 23, 2024 | 3:32 PM

वुमन्स लीग 2024 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. दुसऱ्या पर्वात स्पर्धेची व्याप्ती वाढली असून दोन राज्यात हे सामने पार पडणार आहेत. एकूण 5 संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस निर्माण होणार आहे. जवळपास महिनाभर क्रीडारसिकांना स्पर्धेची मेजवानी अनुभवता येणार आहे.

WPL 2024 : वुमन्स प्रीमियर लीगचं बिगुल वाजलं, 23 फेब्रुवारीपासून असं आहे संपूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक
WPL 2024 : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा 23 फेब्रुवारीपासून, जाणून घ्या कधी कोणता सामना ते
Follow us on

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा कधी आणि केव्हापासून सुरु होणार? या प्रश्नांना पूर्णविराम लागला आहे. बीसीसीआयने वुमन्स प्रीमियर लीगचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या वेळापत्रकानुसार स्पर्धा 23 फेब्रुवारीपासून सुरु होईल आणि अंतिम फेरीचा सामना 17 मार्चला होणार आहे. यंदा स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे. ही स्पर्धा यंदा दोन ठिकाणी होमआर आहे. सुरुवातीचे सामने बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात, तर दुसऱ्या टप्प्यातील सामने दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात होताल. स्पर्धेची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या सामन्यापासून होणार आहे. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे. तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि युपी वॉरियर्स यांच्यात होणार आहे. अंति फेरीपर्यंत एकूण 22 सामने होणार आहेत. 13 मार्चपर्यंत साखळी फेरीचे सामने होतील. तर 15 मार्चला एलिमिनेटर फेरी पार पडेल. तसेच अंतिम फेरीचा सामना 17 मार्चला होणार आहे. सर्व सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होतील.

वुमन्स प्रीमियर लीगचं पूर्ण वेळापत्रक

  • 23 फेब्रुवारी- मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (बंगळुरूमध्ये )
  • 24 फेब्रुवारी- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स (बंगळुरूमध्ये )
  • 25 फेब्रुवारी- गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (बंगळुरूमध्ये )
  • 26 फेब्रुवारी- यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (बंगळुरूमध्ये )
  • 27 फेब्रुवारी- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात जायंट्स (बंगळुरूमध्ये )
  • 28 फेब्रुवारी – मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (बंगळुरूमध्ये )
  • 29 फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (बंगळुरूमध्ये )
  • 1 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स (बंगळुरूमध्ये )
  • 2 मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स (बंगळुरूमध्ये )
  • 3 मार्च -बगुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (बंगळुरूमध्ये )
  • 4 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (बंगळुरूमध्ये )
  • 5 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (दिल्लीमध्ये)
  • 6 मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (दिल्लीमध्ये)
  • 7 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (दिल्लीमध्ये)
  • 8 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (दिल्लीमध्ये)
  • 9 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स (दिल्लीमध्ये)
  • 10 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (दिल्लीमध्ये)
  • 11 मार्च दिल्लीमध्ये – गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (दिल्लीमध्ये)
  • 12 मार्च दिल्लीमध्ये – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (दिल्लीमध्ये)
  • 13 मार्च- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स (दिल्लीमध्ये)
  • 15 मार्च – एलिमिनेटर फेरी (दिल्लीमध्ये)
  • 17 मार्च – अंतिम फेरी (दिल्लीमध्ये)

दिल्ली कॅपिटल्स

एलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन*, लॉरा हॅरिस, मारिझान कॅप, मेग लॅनिंग, मिन्नू मणी, पूनम यादव, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया, तितास साधू

नवीन खरेदी:  एनाबेल सदरलँड, अपर्णा मंडल, अश्विनी कुमारी

गुजरात जायंट्स

एशलेग गार्डनर, बेथ मुनी, दयालन हेमलता, हरलीन देओल, लॉरा वोल्वार्ड, शबनम शकील, स्नेह राणा, तनुजा कंवर

नवीन खरेदी: फोबी लिचफिल्ड, मेघना सिंग, त्रिशा पूजिता, काशवी गौतम, प्रिया मिश्रा, लॉरेन चीटल, कॅथरीन ब्राइस, मन्नत कश्यप, वेदा कृष्णमूर्ती, तरन्नुम पठाण

मुंबई इंडियन्स

अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेली मॅथ्यू, हुमैरा काझी, इसाबेल वोंग, जिंतिमनी कलिता, नताली स्कायव्हर, पूजा वस्त्राकर, प्रियांका बाला, सायका इशाक, यास्तिका भाटिया

नवीन खरेदी: शबनीम इस्माईल, अमनदीप कौर, एस सजना, फातिमा जाफर, कीर्थना बालकृष्णन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

आशा शोबाना, दिशा कासट, एलिस पेरी, हीदर नाइट, इंद्राणी रॉय, कनिका आहुजा, रेणुका सिंग, रिचा घोष, श्रेयंका पाटील, स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन

नवीन खरेदी: जॉर्जिया वेरेहॅम, केट क्रॉस, एकता बिश्त, शुभा सतीश, सभिनेनी मेघना, सिमरन बहादूर, सोफी मोलिनक्स*

युपी वॉरियर्स

एलिसा हिली, अंजली सरवानी, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, पार्श्वी चोप्रा, राजेश्वरी गायकवाड, एस. यशश्री, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्राथ

नवीन खरेदी: दानी व्याट, वृंदा दिनेश, सायमा ठाकोर, पूनम खेमनार, गौहर सुलताना