वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत निराशाजनक सुरुवात झाल्यानंतर भारताने कमबॅक केलं आहे. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून स्पर्धेतील आशा कायम ठेवल्या आहेत. प्रत्येक संघाला साखळी फेरीत चार सामने खेळायचे आहेत. त्यामुळे भारतासाठी उर्वरित दोन्ही सामने महत्त्वाचे आहेत. त्यापैकी एक सामना श्रीलंकेविरुद्ध सुरु आहे आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. उपांत्य फेरी गठायची तर हे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. दरम्यान, श्रीलंकेविरुद्ध भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याची आश्वासक सुरुवात स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 98 धावांची भागीदारी केली. स्मृती मंधानाने 38 चेंडूत 50 धावांची खेळी केली. यात तिने 4 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यानंतर शफाली वर्माने 40 चेंडूत 40 धावा केल्या. या खेळीत तिने 4 चौकार मारले. 98 धावांवर दोन विकेट पडल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनी 30 धावांची भागीदारी. पण 16 धावांवर असताना जेमिमाची विकेट पडली. त्यानंतर हरमनप्रीत कौरचं वादळ अनुभवायला मिळलं.
स्मृती मंधानानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरचं वादळ अनुभवायला मिळालं. अवघ्या 27 चेंडूत हरमनप्रीतने नाबाद 52 धावंची खेळी केली. यावेळी तिने 8 चौकार आणि 3 षटकार मारले. भारताने 20 षटकात 3 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं आहे. श्रीलंकेने भारताची आक्रमक भागीदारी फोडण्यासाठी 7 गोलंदाजांचा वापर केला. दरम्यान चमाऱी अटापट्टू आणि अमा कंचाना हे दोन गोलंदाजच विकेट घेण्यात यशस्वी ठरले. तर स्मृती मंधाना ही रन आऊट झाली.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सजीवन सजना, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग .
श्रीलंका महिला (प्लेइंग इलेव्हन): विश्मी गुणरत्ने, चामारी अटापट्टू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), अमा कांचना, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनवेरा, इनोवा रनवीरा.