वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी नवा नियम, संघांना होणार जबरदस्त फायदा?

| Updated on: Oct 02, 2024 | 7:10 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेसाठी 10 संघ सज्ज झाले आहेत. असं असताना या स्पर्धेपूर्वी आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच असं लागू होणार आहे. काय ते जाणून घ्या

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी नवा नियम, संघांना होणार जबरदस्त फायदा?
Follow us on

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदासाठी दहा संघांनी कंबर कसली आहे. खासकरून भारतीय महिला संघाने पहिल्या जेतेपदासाठी कसून सराव केला आहे. आतापर्यत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघांनीच वुमन्स टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. त्यामुळे यंदा कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताा टी20 वर्ल्डकपसाठी आयसीसीने स्मार्ट रिप्ले सिस्टम लागू करण्याची घोषणा केली आहे. आयसीसीने आपल्या प्रेसनोटमद्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की, टी20 वर्ल्डकपच्या प्रत्येक सामन्यासाठी कमीत कमी 28 कॅमेरे असणार आहेत. डिसीजन रिव्ह्यू सिस्टमपण सर्व सामन्यात असेल. यात हॉक आय स्मार्ट रिप्ले सिस्टम असेल. त्यामुळे टीव्ही अम्पायरला तात्काळ निर्णय घेणं सोपं होईल. एकाच वेळी वेगवेगळ्या अँगलने फुटेज मिळेल आणि त्यामुळे योग्य निर्णय देण्यास मदत होईल. वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच स्मार्ट रिप्ले सिस्टम लागून होणार आहे. यापूर्वी अशी व्यवस्था हंड्रेड आणि आयपीएल 2024 स्पर्धेत करण्यात आली होती.,

स्मार्ट रिप्ले सिस्टममुळे तिसऱ्या पंचांना आता थेट हॉक आय ऑपरेटर्सकडून इनपूट मिळणार आहे. त्यामळे पंच सर्व अँगल एकाच जागी बसून पाहू शकतो. यापूर्वी थर्ड अंपायर आणि हॉक आय ऑपरेटर यांच्यात एक माध्यम असायचं. आता ते या सिस्टममध्ये नसतील. थर्ड अम्पायर आता अजून चांगल्या पद्धतीने विज्युअल्स पाहू शकणार आहेत. स्टंप कॅमेरा 50 फ्रेम प्रति सेकंदपेक्षा कमी गतीतील कोणतीही एक्शन कॅमेऱ्यात कैद करणार आहेत. तर हॉक आय कॅमेरा जवळपास 300 फ्रेम प्रति सेकंदवर रेकॉर्ड करतो. त्यामुळे पंचांना निर्णय घेण्यासाठी आता स्पष्ट फुटेज असेल. यामुळे डीआरएसबाबत लवकर निर्णय घेण्यास मदत होणार आहे.

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा पहिल्यांदा 2009 मध्ये खेळली गेली होती. तेव्हा इंग्लंडच्या महिला संघाने न्यूझीलंडला पराभवाचं पाणी पाजून जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने एक हाती या स्पर्धेवर अधिराज्य गाजवलं. ऑस्ट्रेलियाने सहावेळा जेतेपद जिंकलं आहे. वेस्ट इंडिजने 2016 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं आहे. एक भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. पण तेव्हा ऑस्ट्रेलियाने पराभवाची धूळ चारली होती.