मुंबई : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिला वन डे सामना सुरू आहे. या सामन्यात कॅप्टन हरमनप्रीत कौरने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा बॅटींग करताना टीम इंडियााने 50 ओव्हरमध्ये 282-8 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडून जेमिमाह रॉड्रिग्सने सर्वाधिक 82 आणि पूजा वस्त्राकर हिने नाबाद 62 धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून अॅशले गार्डनर आणि जॉर्जिया वेरहॅम यांनी सर्वाधिक प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
टीम इंडिया बॅटींगला उतरल्यावर या सामन्यातही खराब सुरूवात झाली. सलामीवीर शफाली वर्मा तिसऱ्याच ओव्हरमध्ये १ धाव काढून माघारी परतली. रिचा घोष आणि यास्तिका भाटिया यांनी चांगली भागीदारी केली होती. 21 धावांवर रिचा माघारी परतली. त्यानंतर आलेली हरमनप्रीत कौर अवघ्या 9 धावांवर आऊट झाली . तीन विकेट गेल्यावर दीप्ती शर्मा हिने डाव सावरला खरा पण तिलाही ऑस्ट्रेलियाच्या किंगने आऊट केलं. त्याआधी सेट झालेली यास्तिका भाटिया 49 धावांवर माघारी परतली.
टीम इंडियाच्या विकेट जात असताना दुसरीकडे जेमिमाहने एक बाजू लावून धरली होती. सात विकेट गेल्यानंतर आलेल्य पूजा वस्त्राकरने तुफानी फलंदाजी केली. जेमिमाहने 77 चेंडूत 82 धावांची खेळी केली, यामध्ये तिने सात चौकार मारले. तर पूजाने अवघ्या 46 चेंडूत 62 धावा केल्या, यामध्ये तिने सात चौकार आणि दोन षटकार मारले. पूजाच्या आक्रमक खेळीच्या जोरावर टीम इंडिया तीनशेच्या आसपास गेली. आता टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाच्या महिलांना रोखण्याचं आव्हान असणार आहे.
A valuable FIFTY down the order from @Vastrakarp25 😎
And the Wankhede crowd is impressed 😃👌
Follow the Match ▶️ https://t.co/MDbv7Rm75J#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/TCuLpXsvcd
— BCCI Women (@BCCIWomen) December 28, 2023
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): फोबी लिचफील्ड, अॅलिसा हिली (C/W), एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउन
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (C), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (W), रिचा घोष, स्नेह राणा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक