Retirement | टी-20 वर्ल्ड कप आधी तब्बल चार वर्ल्ड कप विनर खेळाडूंचा तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय, टीमला मोठा झटका

| Updated on: Jan 19, 2024 | 5:59 PM

वर्ल्ड कप तोंडावर आला असताना एकाचवेळी चार खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली आहे. टीमसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण टी-20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात या चारही खेळाडूंची महत्त्वाची भूमिका राहिली होती.

Retirement | टी-20 वर्ल्ड कप आधी तब्बल चार वर्ल्ड कप विनर खेळाडूंचा तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय, टीमला मोठा झटका
Retirement of four West Indies cricketers announced
Follow us on

मुंबई : वन डे वर्ल्ड कपनंतर आता टी-20 वर्ल्ड कप 2024 होणार आहे. आगामी वर्ल्ड कप टीम इंडियासाठी महत्त्वाचा असणार आहे. फायनलमध्ये झालेल्या पराभवामुळे सर्वांनाच तो पराभव जिव्हारी लागलेला आहे. यंदा टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावताना दिसेल. वेस्ट इंडिज आणि अमेरिकाकडे यंदाच्या वर्ल्ड कपचं यजमानपद आहे. यंदा फक्त मेन्सच नाहीतर  वुमन्सचाही वर्ल्ड कप असणार आहे. मेन्स वर्ल्ड कपचं शेड्यूल झालं आहे. मात्र वुमन्सचं शेड्यूल अद्याप समोर आलेलं नाही. अशातच मोठी बातमी समोर आली आहे. अशातच टीममधील एक दोन नाहीतर तब्बल चार खेळाडूंनी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

2016 साली वर्ल्ड कप विजेत्या वेस्ट इंडिज महिला संघातील चार खेळाडूंनी निवृत्तीचा तडकाफडकी निर्णय घेतला आहे. या चारही खेळाडूंनी वर्ल्ड कप जिंकून देण्यात वेस्ट इंडिजसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. अनीसा मोहम्मद, शकेरा सेलमन, किसिया आणि किशोना नाइट अशी या खेळाडूंची नाव आहेत. यंदाचा वुमन्स टी-20 वर्ल्ड कप वर्षाच्या शेवटी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये खेळवला जाणार आहे.

अनीसा मोहम्मद हिने 2005 साली वयाच्या 15 व्या वर्षी पदार्पण केलं होतं. क्रिकेटमधील 21 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक विकेट घेणारी ती खेळाडू आहे. वेस्ट इंडिजकडून हॅट्रिक घेणारी ती पहिला खेळाडू ठरली होती. वेस्ट इंडिज संघाकडून तिने आतापर्यंत एकूण 12 वर्ल्ड कप खेळले आहेत. यामध्ये 5 वन डे वर्ल्ड कप आणि 7 टी-20 वर्ल्ड कप खेळले आहेत.

दरम्यान, शकेरा सेलमन हिने 2008 साली पदार्पण केलं होतं. तिने आतापर्यंत 100 वन डे सामने आणि 96 टी-20 सामने खेळले असून अनुक्रमे 82 आणि 51 विकेट घेतल्या आहेत. किसिया आणि किशोना नाईट या तर दोघी जुळ्या बहिणी आहेत. दोघींनीही लवकरच निवृत्त होण्याचास निर्णय घेतलाय. पुढील महिन्यात दोघी 32 वर्षांच्या होणार आहेत. वर्ल्ड कप तोंडावर असताना दोघींनीही  नवृत्ती जाहीर घेतल्याने सर्वत्र जोरदार चर्चा आहे.