भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया कप 2024 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. टीम इंडियाने पाकिस्तानला 19.2 ओव्हरमध्ये 108 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या सलामी जोडीने टीम इंडियाचा पाया रचला. स्मृती आणि शफालीने 85 धावांची भागीदारी केली. स्मृतीने 45 आणि शफालीने 40 धावा केल्या. या दोघींच्या खेळीमुळे टीम इंडियाचा विजय सोपा झाला. टीम इंडियाचा हा आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धचा सहावा विजय ठरला. उभयसंघात 7 सामने झालेत. त्यापैकी गेल्या वेळेस 2022 मध्ये पाकिस्तानने टीम इंडियाला पराभूत केलं होतं. मात्र यंदा टीम इंडियाने पाकिस्तावर मात करत गेल्या पराभवाचा वचपा घेतला. टीम इंडियाच्या या विजयानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने काय म्हटलं? जाणून घेऊयात.
टीम इंडियाचा हा स्पर्धेतील पहिलाच सामना होता, तोही पाकिस्तान विरुद्ध. पहिला सामना असल्याने कायम दबाव असतोच. मात्र आमच्या सलामी जोडीने आणि गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचं हरमनप्रीत म्हणाली. तसेच हरमन खूप काही बोलली. हरमनने गोलंदाज आणि फलंदाजांचं कौतुक केलं. तसेच शफाली आणि स्मृतीला विजयाचं श्रेय दिलं.
आमच्या गोलंदाजांनी आणि सलामीवीरांनी चांगली कामगिरी केली. पहिला सामना हा नेहमीच दबावाचा असतो, पण आम्ही चांगलंच सांभाळलं. आम्ही टीम म्हणून खरचं चांगलं खेळलो. जेव्हा आम्ही गोलंदाजी करतो तेव्हा आम्ही सुरुवातीच्या यशाबद्दल बोलतो. फलंदाजीमध्ये आम्ही चांगली सुरुवात करू इच्छितो त्यामुळे स्मृती आणि शफाली यांना श्रेय देतो. निर्भय क्रिकेट खेळणे, आज आम्ही ज्या प्रकारे खेळलो त्यामुळे आम्ही खरंच आनंदी आहोत”, असं हरमनप्रीत म्हणाली.
टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, दयालन हेमलता, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि रेणुका ठाकूर सिंग.
पाकिस्तान वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: निदा दार (कॅप्टन), सिद्रा अमीन, गुल फिरोजा, मुनीबा अली (विकेटकीपर), आलिया रियाझ, इरम जावेद, फातिमा सना, तुबा हसन, सादिया इक्बाल, नशरा संधू आणि सय्यदा आरूब शाह.