मेन्स इंडिया टीम 27 जुलैपासून श्रीलंका दौऱ्यात टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. टीम इंडिया श्रीलंके विरुद्ध दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3-3 असे एकूण 6 सामने खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स टीम इंडिया आशिया कप 2024 स्पर्धेसाठी श्रीलंकेला रवाना होणार आहे. यंदा या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान श्रीलंकेकडे आहे. ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेचं आयोजन हे 19 ते 28 जुलै दरम्यान करण्यात आलं आहे. या 10 दिवसांदरम्यान 15 सामने होणार आहेत. स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या संघांना 4 गटात 4-4 नुसार विभागलं आहे. या स्पर्धेनिमित्त आपण टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक आणि मॅच मोबाईल-टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार हे जाणून घेऊयात.
आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने हे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील. तसेच हिंदी आणि इतर भाषेत क्रिकेट चाहत्यांना कॉमेंट्रीचा आनंद घेता येणार आहे.
वूमन्स आशिया कप स्पर्धेतील सामने मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळतील.
टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक
इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 20 जुलै
इंडिया विरुद्ध यूएई, 21 जुलै
इंडिया विरुद्ध नेपाळ, 23 जुलै
टीम इंडियाच्या सामन्यांचा वेळ आणि ठिकाण
🚨 News 🚨
Schedule for the upcoming Women’s T20 Asia Cup held in Sri Lanka are out 🙌
Presenting #TeamIndia’s fixtures 💪 #AsiaCup pic.twitter.com/fN2coot72p
— BCCI Women (@BCCIWomen) June 25, 2024
आशिया कप 2024 स्पर्धेसाठी वूमन्स टीम इंडिया: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), पूजा वस्त्राकार, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि सजाना संजीवन.