आशिया कप वूमन्स 2024 स्पर्धेत टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 7 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवली आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 109 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 3 विकेट्स गमावून आणि 35 बॉलराखून पूर्ण केलं. टीम इंडियाने 14.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 109 धावा केल्या. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धचा एकूण सहावा विजय ठरला. शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने शानदार भागीदारी करत टीम इंडियाचा विजय निश्चित केला.
शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने टीम इंडियाला 109 धावांचा पाठलाग करताना 85 धावांची सलामी भागीदारी करुन दिली. मात्र त्यानंतर 9.3 ओव्हरमध्ये 85 धावांवर स्मृती मंधाना आऊट झाली. स्मृतीने 41 बॉलमध्ये 9 चौकारांच्या मदतीने 45 धावांची खेळी केली. त्यानंतर शफाली वर्मा 40 धावा करुन आऊट झाली. शफालीने 29 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 40 धावा केल्या. शफाली आणि स्मृती दोघींनी अर्धशतक करता आलं नाही. मात्र दोघींनी टीम इंडियाचा विजय निश्चित केला.
दयालन हेमलता 11 बॉलमध्ये 14 धावा करुन माघारी परतली. तर कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्स या जोडीने इंडियाला विजयापर्यंत नेलं. जेमिमाह आणि हरमन या दोघींनी नाबाद 3 आणि 5 धावा केल्या. पाकिस्तानकडून सईदा शाह हीने 2 विकेट्स घेतल्या. तर नशरा संधूने 1 विकेट घेतली.
टीम इंडियाचा विजयी सिक्स
A strong win against Pakistan to start the Women’s Asia Cup T20 2024 for India 👊
📸 @ACCMedia1#INDvPAK: https://t.co/Qd5auhcXGT pic.twitter.com/SUXcUMM6xz
— ICC (@ICC) July 19, 2024
त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानची बॅटिंग फुस्स ठरली. पाकिस्तानचा डाव 19.2 ओव्हरमध्ये 108 धावांवर आटोपला. पाकिस्तानकडून सिद्रा अमीन हीने सर्वाधिक 25 धावा केल्या. तर फातिमा सना आणि तुबा हसन या दोघांनी प्रत्येकी 22*-22 धावा केल्या. टीम इंडियाकडून दीप्ती शर्मा हीने तिघींनी मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर रेणुका सिंह, पूजा वस्त्राकर आणि श्रेयंका पाटील या त्रिकुटाने 2-2 विकेट्स घेतल्या.
टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, दयालन हेमलता, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि रेणुका ठाकूर सिंग.
पाकिस्तान वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: निदा दार (कॅप्टन), सिद्रा अमीन, गुल फिरोजा, मुनीबा अली (विकेटकीपर), आलिया रियाझ, इरम जावेद, फातिमा सना, तुबा हसन, सादिया इक्बाल, नशरा संधू आणि सय्यदा आरूब शाह.