IND vs NZ : टीम इंडियाने न्यूझीलंडला रोखलं, विजयासाठी 161 धावांचं आव्हान

| Updated on: Oct 04, 2024 | 9:30 PM

India vs New Zealand 1st Innings Highlights : न्यूझीलंडने पावरप्लेमध्ये विस्फोटक फलंदाजी करत टीम इंडियाला बॅकफुटवर ढकललं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या धावगतीला ब्रेक लावला. त्यामुळे भारताला 161 धावांचं आव्हान मिळालं आहे.

IND vs NZ : टीम इंडियाने न्यूझीलंडला रोखलं, विजयासाठी 161 धावांचं आव्हान
Womens team india vs nz
Image Credit source: bcci women X Account
Follow us on

आयसीसी वूमन्स टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 161 धावांचं आव्हान दिलं आहे. न्यूझीलंडने 8 च्या रनरेटने 4 विकेट्स गमावून 160 धावा केल्या. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी निर्णायक क्षणी कमबॅक करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखण्यात यशस्वी ठरले. न्यूझीलंडने ज्या प्रकारे आक्रमक सुरुवात केली होती, त्यानुसार भारताला 200 धावांचं आव्हान सहज मिळेल, असं वाटत होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर न्यूझीलंडला 160 धावांपर्यंतच पोहचता आलं. आता भारतीय संघ या विजयी धावांचा कशाप्रकारे पाठलाग करते? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

न्यूझीलंडची आक्रमक सुरुवात

सुझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमर या सलामी जोडीने पावरप्लेचा पूर्ण फायदा घेत चौफेर फटकेबाजी केली. या दोघींनी पावरप्लेमध्येच अर्धशतकी भागीदारी केली. दोघीही फटकेबाजी करत असल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. विकेट्सच्या शोधात असलेल्या टीम इंडियासमोर या जोडीला रोखण्याचं आव्हान होतं. अखेर टीम इंडियाची प्रतिक्षा संपली. टीम इंडियाने न्यूझीलंडला झटपट 2 झटके दिले. सूझी बेट्स 27 आणि प्लिमर 34 धावांवर बाद झाली. त्यामुळे न्यूझीलंडची स्थिती 67-0 वरुन 67-2 अशी झाली.

त्यानंतर अमेलिया केर हीने 13 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर ब्रुक हॅलिडे हीने 12 चेंडूत 16 धावा केल्या. तर कॅप्टन सोफी डेव्हाईन हीने 36 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 57 धावांची खेळी केली. तर मॅडी ग्रीनने नॉट आऊट 5 रन्स केल्या. टीम इंडियाकडून रेणुका सिंह हीने 2 विकेट्स मिळवल्या. तर अरुंधती रेड्डी आणि आशा शोभना या दोघींनी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडिया 161 धावा करणार?

न्यूझीलंड वूमन्स प्लेईंग ईलेव्हन : न्यूझीलंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : सोफी डेव्हाईन (कॅप्टन), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), जेस केर, रोझमेरी मायर, ली ताहुहू आणि ईडन कार्सन.

वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.