टीम इंडियाची आयसीसी वूमन्स टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत पराभवाने सुरुवात झाली आहे. टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. न्यूझीलंडने यासह विजयी सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 161 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडिया 102 धावांवर ऑलआऊट झाली. न्यूझीलंडने अशाप्रकारे हा सामना 58 धावांच्या फरकाने जिंकला.
टीम इंडियाचे फलंदाज न्यूझीलंडसमोर सपशेल अपयशी ठरले. टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला 15 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने 15 धावा केल्या. दीप्ती शर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्स या दोघींनी प्रत्येकी 13-13 धावा केल्या. तर स्मृती मंधाना आणि रिचा घोष या दोघींनी प्रत्येकी 12-12 धावांचं योगदान दिलं. तर इतर फलंदाजांनी घोर निराशा केली. चौघींना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. रेणुका सिंह आली तशीच गेली. तर आशा शोभना 6 धावांवर नाबाद परतली. न्यूझीलंडकडून रोझमेरी मायर हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर ली ताहुहू हीने 3 विकेट्स घेतल्या. ईडन कार्सनने दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अमेलिया केर हीने एक विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
दरम्यान त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 160 धावा केल्या. न्यूझीलंडकडून सुझी बेट्स हीने 27 धावा केल्या. जॉर्जिया प्लिमर हीने 34 धावांचं योगदान दिलं. अमेलिया केर 13 धावा करुन माघारी परतली. ब्रुक हॅलिडे हीने 16 रन्स केल्या. तर कॅप्टन सोफी डेव्हाईन आणि मॅडी ग्रीन ही जोडी नाबाद परतली. सोफी डेव्हाईन हीने नाबाद 57 धावा केल्या. तर ग्रीनने नॉट आऊट 5 रन्स केल्या. टीम इंडियाकडून रेणुका सिंह हीने 2 विकेट्स घेतल्या. तर अरुंधती रेड्डी आणि आशा शोभनान या दोघींनी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाची पराभवाने सुरुवात
New Zealand win Match 4⃣ of the #T20WorldCup.#TeamIndia will aim to bounce back in the next game.
Scorecard ▶️ https://t.co/XXH8OT5MsK#INDvNZ | #WomenInBlue pic.twitter.com/DmzOpOq87g
— BCCI Women (@BCCIWomen) October 4, 2024
न्यूझीलंड वूमन्स प्लेईंग ईलेव्हन : न्यूझीलंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : सोफी डेव्हाईन (कॅप्टन), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), जेस केर, रोझमेरी मायर, ली ताहुहू आणि ईडन कार्सन.
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.