Odi Series : शुक्रवारपासून टीम इंडियाच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात, जाणून घ्या वेळापत्रक

| Updated on: Jan 09, 2025 | 10:09 PM

Womens India vs Women Ireland Odi Series : वूमन्स टीम इंडिया मायदेशात आयर्लंडविरुद्ध एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेला 10 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

Odi Series : शुक्रवारपासून टीम इंडियाच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात, जाणून घ्या वेळापत्रक
Follow us on

वूमन्स टीम इंडिया मायदेशात नववर्षात पहिलीवहिली एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया मायदेशात आयर्लंडविरुद्ध एकूण 3 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांनी कसून सराव केला आहे. सांगलीकर स्मृती मानधना ही टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. दीप्ती शर्मा हीच्याकडे उपकर्णधारपदाची सूत्र असणार आहेत. तर गॅबी लुईसकडे आयर्लंड टीमची धुरा आहे. मालिकेला शुक्रवार 10 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. तर अंतिम सामना हा 15 जानेवारीला होणार आहे. तर दुसरा सामना हा 12 जानेवारीला पार पडणार आहे. मालिकेतील तिन्ही सामने हे एकाच ठिकाणी होणार आहेत. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये हे सामने आयोजित करण्यात आले आहेत.

उभयसंघातील या मालिकेतील सामने हे आयसीसी चॅम्पियनशीप अंतर्गत खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका फार महत्त्वाची अशी आहे. या मालिकेकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, पहिला सामना, शुक्रवार 10 जानेवारी,

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, दुसरा सामना, रविवार 12 जानेवारी,

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, तिसरा सामना, बुधवार 15 जानेवारी

महिला ब्रिगेडचा पहिल्या सामन्याआधी जोरदार सराव

आयर्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ: स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, उमा चेत्री (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, राघवी बिस्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवेर, तीतस साधू, सायमा ठाकोर आणि सायली सातघरे.

एकदिवसीय मालिकेसाठी आयर्लंड महिला संघ : गॅबी लुईस (कॅप्टन), एवा कॅनिंग, क्रिस्टीना कूल्टर रीली, अलाना डाल्जेल, लॉरा डेलानी, जॉर्जिना डेम्पसी, सारा फोर्ब्स, अर्लीन केली, जोआना लॉगरन, एमी मॅगुइरे, लिआ पॉल, ओरला प्रेंडरगॅस्ट, ऊना रेमंड-होए, फ्रेया सार्जेंट आणि रेबेका स्टोकेल.