मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2024 मधील दुसऱ्या पर्वातील विजेतेपदावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदा नाव कोरलं आहे. वुमन्स संघाने आरसीबीचा तब्बल 17 वर्षांचा दुष्काळ संपवला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मेन्स संघाला आतापर्यंतच्या 16 मोसमात एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. मात्र वुमन्स संघाने दुसऱ्याच पर्वात ट्रॉफी जिंकत इतिहास रचला आहे. फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघावर आरसीबी संघाने 8 विकेटने विजय मिळवला. ट्रॉफी जिंकल्यावर आरसीबी संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने सामना संपल्यावर व्हिडीओ कॉल केला. विराटने केलेल्या कॉलचा सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल व्हायरल झाला आहे.
King kohli on video call
Congratulating all the RCB Players#ViratKohli𓃵 #WPLFinal pic.twitter.com/E9izzHFUjx— JATIN𝕏 🇮🇳 (@BeingJatinsk27) March 17, 2024
King Kohli congratulating all the RCB players on video call 😭❤️#ViratKohli𓃵 pic.twitter.com/cc3qxw56Rd
— Ravi (@kukreja_ravii) March 17, 2024
रिचा घोष हिने चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केल्यावर आरसीबीचे चाहते, ड्रेसिंग रूममधील खेळाडू सगळेच आनंदी झाले. सामना संपल्यावर विराट कोहलीनेही वुमन्स आरसीबी संघाची कॅप्टन स्मृती मंधानाला व्हिडीओ कॉल केला. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
प्रथम बॅटींग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाचा डाव 113 धावांवर आटोपला. दिल्ली संघाकडून शफाली वर्मा हिने सर्वाधिक 44 धावांची आक्रमक खेळी केली. आरसीबी संघाकडून सोफी मोलिनक्सने तीन विकेट आणि श्रेयांका पाटील हिने चार विकेट घेतल्या. दिल्ली संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबी संघाने 19 व्या ओव्हरमध्ये तिसऱ्या चेंडूवर विजय साकार केला. आरसीबीकडून स्मृती मंधाना हिने 31 धावा तर सोफी डिव्हाईन 32 धावा आणि एलिस पेरी नाबाद 35 धावा आणि रिचा घोष नाबाद 17 धावा केल्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, मिन्नू मणी.