Richa Ghosh | रिचा घोष हीची वर्ल्ड कपमध्ये तडाखेदार कामगिरी, रँकिंगमध्ये कुठे?

| Updated on: Feb 21, 2023 | 10:05 PM

आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत रिचा घोष हीने शानदार कामगिरी केली आहे.

Richa Ghosh | रिचा घोष हीची वर्ल्ड कपमध्ये तडाखेदार कामगिरी, रँकिंगमध्ये कुठे?
Follow us on

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने आयर्लंडला पराभूत करत सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म केलं आहे. टीम इंडियाने या मोहिमेतील पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पराभव करत धडाक्यात सुरुवात केली होती. या सलामीच्या सामन्यात टीम इंडियाची विकेटकीपर बॅट्समन रिचा घोष हीने वादळी खेळी केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहचवण्यापर्यंत रिचाने निर्णायक भूमिका बजावली आहे. आता आयसीसीने रँकिंग जाहीर केली आहे. या फलंदाजांच्या रँकिंगमध्ये टीम इंडियाचे अनेक फलंदाज आहेत.

रिचाची शानदार कामगिरी

टीम इंडियाने वर्ल्ड कप मोहिमेत आतापर्यंत पाकिस्तान, विंडिज, इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्ध 4 सामने खेळले. यात आयर्लंडचा अपवाद वगळता रिचाने सातत्याने शानदार कामगिरी केली.

पाकिस्तान

रिचाने 20 बॉलमध्ये नाबाद 31 धावा केल्या. यामध्ये 5 खणखणीत चौकारांचा समावेश होता. रिचाने 18 व्या ओव्हरमध्ये सलग 3 चौकार ठोकत टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणलं. जेमिमाह आणि रिचा या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 58 धावांची विजयी आणि तितकीच निर्णायक भागीदारी केली.

हे सुद्धा वाचा

विंडिज

रिचाने 32 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 44 धावांची खेळी केली. रिचाने टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना चौकार ठोकत शानदार फिनिशिंग टच दिला.

इंग्लंड

रिचाने इंग्लंड विरुद्ध 34 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 सिक्समध्ये 47 धावांची खेळी केली. मात्र रिचा आयर्लंड विरुद्ध अपयशी ठरली. रिचा आयर्लंड विरुद्ध पहिल्याच बॉलवर आऊट झाली.

दरम्यान रँकिंगमध्ये टीम इंडियाची स्मृति मंधाना (3) , शेफाली वर्मा (10), जेमिमाह रॉड्रिग्स (12), हरमनप्रीत कौर (13) आणि रिचा (20) असे एकूण 5 फलंदाज पहिल्या 20 मध्ये आहेत.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.