वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या महत्त्वपूर्ण सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकता प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या सामन्यात काय होते याकडे लक्ष लागून आहे. तसं पाहिलं तर तिन्ही संघांना उपांत्य फेरीची संधी आहे. पण हा सामना न्यूझीलंडने जिंकला तर थेट उपांत्य फेरी गाठेल. पण हरला तर मात्र उपांत्य फेरीचं गणित नेट रनरेटवर ठरेल. पाकिस्तानचा संघ नेट रनरेटच्या बाबतीत फारच मागे आहे. त्यामुळे जिंकूनही पात्र होऊ शकणार नाही. पण भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीचा संघ ठरणार आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना पाकिस्तान जिंकावा असंच वाटत आहे. पण पाकिस्तानची संपूर्ण स्पर्धेतील खेळी पाहता जिंकेल असं वाटत नाही. पण एखादा चमत्कार घडावा असा सामना झाला तर मात्र भारताला संधी मिळू शकते. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाईनने सांगितलं की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. भारताविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केली. हा नवा खेळ आणि नवा संघ आहे. फार पुढे जाता येत नाही. संघात एक बदल केला आहे. कॅस्परेक बाहेर केलं आहे. आम्हाला माहित आहे की हा सामना किती महत्त्वाचा आहे.’
फातिमा सनाने विजयाचा निर्धार केला आहे. उपांत्य फेरीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे. ‘आम्ही नेट रनरेटनुसार खेळू. न्यूझीलंडविरुद्ध आमची मालिका चांगली होती. मी तुबाची जागा घेत आहे.’, असं फातिमा सानाने सांगितलं. न्यूझीलंडने या खेळपट्टीवर भारताविरुद्ध 160 धावा केल्या होत्या. आउटफिल्ड थोडे वाळूवर आधारित आहे. एक पाटा विकेट दिसत आहे. या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या होऊ शकते.
पाकिस्तान महिला (प्लेइंग इलेव्हन): मुनीबा अली (विकेटकीपर), सिद्रा अमीन, सदफ शमास, निदा दार, ओमामा सोहेल, आलिया रियाझ, फातिमा सना (कर्णधार), इरम जावेद, सय्यदा आरूब शाह, नशरा संधू, सादिया इक्बाल.
न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास