अवघ्या काही तासात रंगणार वुमन्स टी20 वर्ल्डकचा थरार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

| Updated on: Oct 02, 2024 | 4:16 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा अनुभव घेण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. 3 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. जेतेपदासाठी 10 संघ मैदानात असून ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेत वरचष्मा राहिला आहे. भारताने अद्याप एकदाही जेतेपद मिळवलेलं नाही.

अवघ्या काही तासात रंगणार वुमन्स टी20 वर्ल्डकचा थरार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
Follow us on

वुमन्स टी20 वर्ल्डकपचा थरार अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. बांगलादेशमधील तणावपूर्ण स्थिती पाहता हा सामना यूएईत करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धचा पहिला सामना 3 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण दहा संघांनी भाग घेतला आहे. तसेच पाच पाच संघांची दोन गटात विभागणी केली आहे.ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ अ गटात आहेत.तर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंड हे संघ ब गटात आहेत. भारताचा पहिला सामना 4 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. त्यानंतर 6 ऑक्टोबर भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील. 9 ऑक्टोबरला भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत होईल. 13 ऑक्टोबर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होईल. पहिला उपांत्य फेरीचा सामना 17 ऑक्टोबरला, तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना 18 ऑक्टोबरला होईल. 20 ऑक्टोबरला अंतिम सामना होईल.

महिला T20 विश्वचषक 2024 वेळापत्रक
तारीख सामने गट वेळ स्थान
3 ऑक्टोबर, गुरुवार बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड दुपारी 3:30 वाजता शारजाह
3 ऑक्टोबर, गुरुवार पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका  संध्याकाळी 7:30 वाजता  शारजाह
4 ऑक्टोबर, शुक्रवार दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज दुपारी 3:30 वाजता दुबई
4 ऑक्टोबर, शुक्रवार भारत विरुद्ध न्यूझीलंड संध्याकाळी 7:30 वाजता दुबई
5 ऑक्टोबर, शनिवार बांगलादेश विरुद्ध इंग्लंड दुपारी 3:30 वाजता शारजाह
5 ऑक्टोबर, शनिवार ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संध्याकाळी 7:30 वाजता शारजाह
6 ऑक्टोबर, रविवार भारत विरुद्ध पाकिस्तान दुपारी 3:30 वाजता दुबई
6 ऑक्टोबर, रविवार वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड संध्याकाळी 7:30 वाजता दुबई
7 ऑक्टोबर, सोमवार इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संध्याकाळी 7:30 वाजता शारजाह
8 ऑक्टोबर, मंगळवार ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संध्याकाळी 7:30 वाजता शारजाह
9 ऑक्टोबर, बुधवार दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड दुपारी 3:30 वाजता दुबई
9 ऑक्टोबर, बुधवार भारत विरुद्ध श्रीलंका संध्याकाळी 7:30 वाजता दुबई
10 ऑक्टोबर, गुरुवार बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज संध्याकाळी 7:30 वाजता शारजाह
11 ऑक्टोबर, शुक्रवार ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संध्याकाळी 7:30 वाजता दुबई
12 ऑक्टोबर, शनिवार न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका दुपारी 3:30 वाजता शारजाह
12 ऑक्टोबर, शनिवार बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका संध्याकाळी 7:30 वाजता दुबई
13 ऑक्टोबर, रविवार इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड दुपारी 3:30 वाजता शारजाह
13 ऑक्टोबर, रविवार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संध्याकाळी 7:30 वाजता शारजाह
14 ऑक्टोबर, सोमवार पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संध्याकाळी 7:30 वाजता दुबई
15 ऑक्टोबर, मंगळवार इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संध्याकाळी 7:30 वाजता दुबई
17 ऑक्टोबर, गुरुवार TBD उपांत्य फेरी 1 संध्याकाळी 7:30 वाजता दुबई
18 ऑक्टोबर, शुक्रवार TBD उपांत्य फेरी 2 संध्याकाळी 7:30 वाजता शारजाह
20 ऑक्टोबर, रविवार TBD अंतिम संध्याकाळी 7:30 वाजता दुबई