IND vs PAK : विकेटकीपर ऋचा घोषमुळे आशा शोभनावरील मोठं संकट टळलं, नाही तर..

| Updated on: Oct 06, 2024 | 5:14 PM

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंचं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. महत्त्वाच्या सामन्यात दोन सोपे झेल सोडले, त्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. असं असताना दुसरीकडे, विकेटकीपर ऋचा घोषने अप्रतिम झेल पकडला.

IND vs PAK : विकेटकीपर ऋचा घोषमुळे आशा शोभनावरील मोठं संकट टळलं, नाही तर..
Image Credit source: video grab
Follow us on

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामना सुरु आहे. हा सामना भारताला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. त्यात भारताला नेट रनरेटही व्यवस्थित ठेवायचा आहे. असं असताना पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन घडलं. दोन सोपे झेल सोडल्याने भारतीय क्रीडाप्रेमींनी असा कसा वर्ल्डकप जिंकणार हे सांगण्यास सुरुवात केली आहे. अरुंधती रेड्डीच्या गोलंदाजीवर दोन सोपे झेल आशा शोभनाने सोडले. पण संबंधित खेळाडू झटपट बाद झाल्याने मोठं संकट टळलं. नाही तर मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेतला असता. या सामन्यात ऋचा घोषच्या झेलच कौतुक होत आहे. एकीकडे आशा शोभनाचा आत्मविश्वास कमी झाला असताना फातिमा सानाने आक्रमक पवित्रा घेतला होता. मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेईल असंच वाटत होतं. सलग दोन चौकार मारून तिने हेतूही स्पष्ट केला होता. पण तिसऱ्यांदा चेंडूवर आक्रमक फटका मारताना चुकली आणि कट लागून ऋचा घोषने अप्रतिम झेल पकडला.

झेल पकडण्यासाठी 0.44 सेकंदाचा अवधी होती. पण विकेटकीपर ऋचा घोषने कोणतीही चूक केली नाही. तसेच फातिमा सानाला बाद करण्यात यश मिळालं. खरं तर ती शून्यावर बाद होणार होती. पण 8 चेंडूत चौकारांच्या मदतीने 13 धावा केल्या. तिची आक्रमक खेळी पाहून मोठी धावसंख्या उभारते की काय अशी धाकधूक लागून होती. कारण अरुंधती रेड्डीच्या गोलंदाजीवर आशा शोभनाने तिचा सोपा झेल सोडला होता. त्यानंतर तिच्याच गोलंदाजीवर फातिमाने आक्रमक पवित्रा घेतला. फातिमाने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर निदा दारने दोन धावा काढल्या. तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत फातिमाला स्ट्राईक दिली. फातिमाने मग काय चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारले. पण सहाव्या चेंडूवर फातिमा फसली. पण या विकेटचं पूर्ण श्रेय ऋता घोषला जाईल. आशा शोभनाच्या गोलंदाजीवर फातिमा सानाला बाद करण्यात यश मिळालं. त्यामुळे तिचा जीव भांड्यात पडला असेल.

दोन संघांची प्लेइंग 11

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, एस सजना, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.

पाकिस्तान महिला (प्लेइंग इलेव्हन): मुनीबा अली (विकेटकीपर), गुल फिरोजा, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, फातिमा सना (कर्णधार), तुबा हसन, नशरा संधू, सय्यदा आरूब शाह, सादिया इक्बाल.