IND vs NZ : टीम इंडियाच्या पराभवासाठी कोण जबाबदार? हरमनप्रीतने कुणावर फोडलं खापर?

| Updated on: Oct 04, 2024 | 11:59 PM

Harmanpreet Kaur Post Match Presentation : हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात भारतीय महिला क्रिकेट संघाची टी 20i विश्व चषक स्पर्धेत पराभवाने सुरुवात झाली. न्यूझीलंडने भारताचा 58 धावांनी पराभव केला.

IND vs NZ : टीम इंडियाच्या पराभवासाठी कोण जबाबदार? हरमनप्रीतने कुणावर फोडलं खापर?
harmanpreet kaur ind vs nz
Follow us on

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. टीम इंडिया न्यूझीलंडला पराभूत करुन विजयी सलामी देण्याच्या मानसाने मैदानात उतरली होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. न्यूझीलंडने टीम इंडियावर 58 धावांच्या मोठ्या फरकाने मात करत विजयी सुरुवात केली. टीम इंडियाला या पहिल्याच पराभवामुळे आता साखळी फेरीतील उर्वरित 3 सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी पुढील सामना हा ‘करो या मरो’ असाच आहे.

न्यूझीलंडला कॅप्टन सोफी डेव्हाईन हीच्या नाबाद 57 धावांच्या खेळीमुळे 20 षटकांमध्ये 4 विकेट्स गमावून 160 पर्यंत मजल मारता आली. त्यामुळे भारताला 161 धावांचं आव्हान मिळालं. मात्र या प्रत्युत्तरात भारताचा डाव हा 19 षटकांमध्येच 102 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून एकीलाही 15 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत.त्यामुळे टीम इंडियाला तब्बल 58 धावांनी पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाच्या पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हीने काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.

हरमनप्रीत कौर काय म्हणाली?

“आज आम्ही सर्वोत्तम क्रिकेट खेळलो नाही. पुढे जाऊन आम्हाला कोणत्या भागात सुधारणा करायची आहे, याचा विचार करावा लागेल. आमच्यासाठी आता प्रत्येक सामना हा महत्त्वाचा आहे. तसेच आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. आम्ही काही वेळा संधी निर्माण केली नाही असं नाही. मात्र न्यूझीलंड आमच्यापेक्षा चांगली खेळली, यात काहीच शंका नाही. मात्र वर्ल्ड कप एक मोठी स्पर्धा आहे. इथे तुमच्या चुकांना वाव नसतो. आम्ही अनेकदा 160-170 धावांचा पाठलाग केला आहे. पण या खेळपट्टीवर 10-15 धावा खूप होत्या. एका टप्प्यावर, त्यांनी ज्या प्रकारे सुरुवात केली, मला वाटलं होतं की विजयासाठी 180 धावांचं आव्हान मिळेल”, असं हरमनप्रीतने नमूद केलं.

हे सुद्धा वाचा

न्यूझीलंड वूमन्स प्लेईंग ईलेव्हन : न्यूझीलंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : सोफी डेव्हाईन (कॅप्टन), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), जेस केर, रोझमेरी मायर, ली ताहुहू आणि ईडन कार्सन.

वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.