मुंबई : आयसीसी महिला वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत (2022 Women’s Cricket World Cup) आज भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सामना सुरु आहे. ऑकलंडमध्ये सुरु असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ऑस्ट्रेलियाची जलदगती गोलंदाज डर्सी ब्राउनने हा निर्णय योग्य ठरवला. तिने चौथ्या षटकात स्मृती मानधनाला (10) आणि सहाव्या षटकात शेफाली वर्माला (12) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारतीय संघ अडचणीत असताना मिताली राज (Mithali Raj) आणि यास्तिका भाटियाने (Yastika Bhatia) डाव सावरला. दोघींमध्ये शतकी भागीदारी झाली. मिताली आणि यस्तिका या दोघींनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली. यादरम्यान, दोघींनी भारताकडून तिसर्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी रचण्याचा रेकॉर्ड केला.
आधी मिताली राजने अर्धशतक पूर्ण केले. यानंतर यास्तिका भाटियानेही अर्धशतक झळकावले. यास्तिका 59 धावांवर बाद झाली, जे तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचं तसेच या महिला विश्वचषकातील पहिले अर्धशतक होते.
The left-hander is on song against Australia! ?
That’s a second ODI half-century for Yastika Bhatia.#CWC22 pic.twitter.com/c9f1Lbsgdf
— ICC (@ICC) March 19, 2022
यास्तिका भाटिया आणि मिताली राज यांनी या सामन्यात 154 चेंडूत 130 धावांची भागीदारी केली. भारतासाठी तिसऱ्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी आहे. ही भागीदारी अशा वेळी रचली जेव्हा संघाला त्याची सर्वाधिक गरज होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यास्तिका आणि मिताली या दोघांनीही या विश्वचषकात यापूर्वी काही खास कामगिरी केली नव्हती. पण, निर्णायक सामन्यात संघाला संकटातून बाहेर काढण्याची वेळ आली, तेव्हा अनुभव आणि उत्साहाने सुसज्ज असलेली ही जोडी आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यात यशस्वी ठरली.
130 Runs (154 balls)
This was the Highest 3rd Wicket Partnership for India
Mithali Raj & Yastika Bhatia ??#CWC22 #AUSvIND pic.twitter.com/MRnm5siyMF
— Female Cricket #CWC22 (@imfemalecricket) March 19, 2022
मिताली राजने 96 चेंडूत 68 धावा केल्या, जे तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 63 वे अर्धशतक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गेल्या 5 डावातील ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 21 सप्टेंबर 2021 रोजी मकाय येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात तिने 63 धावा केल्या होत्या. सध्याच्या विश्वचषकात मिताली राजचे हे पहिले अर्धशतक आहे. या अर्धशतकासह मिताली महिला विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारी फलंदाज ठरली आहे.
A captain’s knock by Mithali Raj bringing up her fifty ?#CWC22 pic.twitter.com/ETld1R829d
— ICC (@ICC) March 19, 2022
या विश्वचषक स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीतने तिचा फॉर्म कायम ठेवला आहे. तिने आक्रमक फटकेबाजी करत शानदार अर्धशतक झळकावलं. तसेच ती नाबाद परतली. तिने पूजा वस्त्राकरसोबत 7 व्या विकेटसाठी 47 चेंडूत 64 धावांची भागीदारी केली. दोघींनी अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. हरमनने 47 चेंडूत 6 चौकारांसह 57 धावा फटकावल्या तर पूजाने 28 चेंडूत 2 षटकार आणि एका चौकारासह 34 धावा फटकावल्या.
Harmanpreet Kaur brings up her 15th ODI fifty ?#CWC22 pic.twitter.com/EjlpFScXPB
— ICC (@ICC) March 19, 2022
इतर बातम्या
CSK IPL 2022: धोनीच बेस्ट फिनिशर का? शेवटच्या पाच षटकातील ‘या’ आकेडवारीवर नजर मारा म्हणजे समजेल