Icc World Cup 2023 | शनिवारी वर्ल्ड कपमध्ये डबल धमाका, 4 संघ आमनेसामने

| Updated on: Oct 06, 2023 | 11:53 PM

Icc World Cup 2023 Double Header Live Streaming | क्रिकेट चाहत्यांना शनिवारी आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये डबल हेडरचा थरार अनुभवता येणार आहे. हे डबल हेडरमधील 2 सामने कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या.

Icc World Cup 2023 | शनिवारी वर्ल्ड कपमध्ये डबल धमाका, 4 संघ आमनेसामने
Follow us on

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 2 सामन्यांचं यशस्वीपणे आयोजन करण्यात आलं आहे. सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडवर 9 विकेट्सने मात करत 2019 फायनलमधील पराभवचा वचपा घेतला. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सवर 81 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आता शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड कपमधील पहिला डबल हेडर खेळवण्यात येणार आहे. या डबल हेडरमध्ये एकूण 4 संघ मैदानात असणार आहेत. बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे चारही संघ वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना खेळणार आहेत.

शनिवारी पहिला डबल हेडर

पहिल्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने असणार आहेत. हा सामना धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर दुसरा सामना हा दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे.

दोन्ही सामने कुठे पाहता येणार?

बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका हे सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येतील. तर मोबाईलवर हे सामने डिज्नी प्लस हॉटस्टार या एपवर पाहता येतील.

बांगलादेश टीम | शकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन कुमेर दास, तन्झिद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (विकेटकीपर), तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराझ, नसुम अहमद, शाक महेदी हसन, तस्किन रहमान, मुस्तफीर रहमान , हसन महमूद , शोरीफुल इस्लाम आणि तनझिम हसन साकीब.

अफगाणिस्तान टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.

दक्षिण आफ्रिका टीम | टेम्बा बावुमा (कॅप्टन), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी ड्युसेन, विल्यम ड्युसेन आणि लीडर वॅन्सी .

श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, महेश थेक्षाना, दुनिथ वेललागे, कसून राजिथा, दुनिथ वेललागे, कासुन राजिथा, मथीशा पथिराणा, दिलशान मधुशंका आणि दुशन हेमंथा.