मुंबई : वर्ल्ड कप 2023 ला काही दिवस बाकी असताना सर्व संघ ताकदीने उतरणार आहेत. चॅम्पियन संघ असलेल्या ऑस्ट्रलियाला मोठा धक्का बसला आहे. वर्ल्ड कपच्या तोंडावर असताना वन डे मध्ये सलग दोन सामने गमावणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. भारताच्या सीनिअर खेळाडूंना विश्रांती दिली असताना युवा खेळाडूंनीच कांगारूंचा घामटा काढला. दुसऱ्या वन डे सामन्यामध्ये शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी कहरच केला होता. दोघांनीही तोडफोड फलंदाजी करत वैयक्तित शतकं मारली होतीत.
राहुल आणि सूर्याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 400 धावांचं आव्हान दिलं होतं. याचाच धागा पकडत ए बी डिव्हिलिअर्सने यंदाच्या वर्ल्ड कपबाबत एक भविष्यवाणी केलीये. शुबमन गिल वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असेल, असं भाकित ए बी डिव्हिलिअर्सने म्हटलं आहे. यावेळी बोलताना एबीने शुबमन गिल याचं कौतुक केलं आहे.
शुबमन गिल याला आयपीएलमध्ये पाहिलं असून त्याला आणखी क्रिकेट खेळायचं आहे. भविष्यात त्याच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळू शकते. शुबमन याचं खेळण्याचं खास तंत्र असून त्याच्याकडे वेगवेगळे शॉट्स खेळण्याची ताकद असल्याचंही डिव्हिलियर्स म्हणाला.
दरम्यान, शुबमन गिल सध्या कडक फॉर्ममध्ये असलेला पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतही गिलने धावांचा पाऊ पाडला आहे. पहिल्या वन डे सामन्यामध्ये 74 आणि दुसऱ्या वन डे सामन्यामध्ये 104 धावा करत महत्त्वाची खेळी करत भारताच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली होती.
रोहित शर्मा(C), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (VC), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव