मुंबई : यंदाच्या वन डे वर्ल्ड कप 2023ला ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे मुख्य अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये 15 खेळाडूंची यादी जाही केली. निवड झालेल्या संघामध्ये के. एल. राहुल आणि इशान किशन या दोघांची निवड झाली. यावरून आता गोची झाली आहे की राहुल प्लेइंग 11 असणार मग इशानला संघात कशासाठी घेतलं? यावर अजित आगरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून संघातील मुख्य खेळाडू दुखापती होते. श्रेयस अय्यर, के.एल. राहुल आणि जसप्रीत बुमराह हे परत आले आहेत. त्यामुळे संघ संतुलित होणार असून के.एल. राहुल आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू असल्याचं अजित आगरकर यांनी सांगितलं. त्यानंतर पत्रकारांनी एक उलट प्रश्न केला की, राहुल की इशान कोणाला संधी देणार? यावर बोलताना, आम्ही याबाबत अजुन काही विचार केला नाही. ईशान ओपनही करू शकतो पण ते सर्व काही नंतर ठरवू. जे संघासाठी योग्य असेल त्याला संधी देण्यात येईल, असं आगरकर म्हणाले.
आशिया कपमध्ये के. एल. राहुलच्या जागेवर इशाान किशन याला संधी मिळाली होती. या संधीचं त्याने खऱ्या अर्थाने सोनं केलं. पाकिस्तानविरूद्धच्या मॅचमध्ये त्याने टीम इंडियाचा डाव सावरला होता. मधल्या फळीमध्येही तो चांगली फलंदाजी करू शकतो हे त्याने सिद्ध केलं आहे.
वर्ल्ड कप मोहिमेला 5 ऑक्टोबरला सुरूवात होणार आहे, टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्याने होणार आहे. हा सामना चेपॉक मैदानावर 8 ऑक्टोबरला पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 10 संग असून 45 दिवस हा थरार चालणार आहे. त्यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबरला पहिला आणि दुसरा सेमी फायनल सामना होईल. तर 17 नोव्हेंबरला महाअंतिम सामना होईल.