मुबई : वर्ल्ड कप 2023 ला सुरुवात झाली असून शुक्रवारी झालेल्या सामन्यामध्ये पाकिस्तान संघाने विजयाचा नारळा फोडला आहे. पाकिस्तानने नेदरलँड संघाचा पहिला सामना 81 धावांनी जिंकला. कर्णधार बाबर आझम याच्या नेतृत्त्वाखाली वर्ल्डकप मिशनची विजयाने सुरूवात केलीये. बाबर आझम याने फक्त विजयच नाही मिळवला तर भारतामध्ये मोठा इतिहास रचला आहे. या विजयासह बाबरने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
भारतामध्ये पाकिस्तान संघ दोनवेळा वर्ल्ड कप खेळण्यासाठी आला होता. 1996 मध्ये पाकिस्तान संघ पहिल्यांदा भारतामध्ये वर्ल्ड खेळण्यासाठी आला होता. त्यावेळी भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान या तीन देशांकडे संयुक्तपणे यजमानपद होतं. वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये भारताने 39 धावांनी पाकिस्तानचा पराभव केला होता.
2011 साली झालेल्या वर्ल्ड कपचं यजमानपद भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या तीन संघांकडे यजमानपद होतं. सेमी फायनलमध्ये भारताने पाकिस्तान संघाचा 29 धावांनी पराभव केला होता. पाकिस्तान संघाचा पराभव करत भारतीय संघाने फायनलध्ये प्रवेश केला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं होतं. नेदरलँडविरूद्ध विजय मिळवत बाबर आझम याने आपल्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तान संघाला वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळवून दिला आहे.
दरम्यान, पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 286 धावांवर त्यांचा संघ ऑल आऊट झाला. फखर जमान (१२), बाबर आझम (५) आणि इमाम उल हक (१५) यांच्या रूपाने केवळ ३८ धावांच्या आत आऊट झाले होते. मात्र पाकिस्तानकडून सौद शकील याने सर्वाधित 68 धावांची दमदार खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ 50 ओव्हरच्या आतमध्येच 205 धावांवर ऑल आऊट झाला.