World Cup 2023 आधी टीमला मोठा धक्का, स्टार खेळाडू आशिया कप आणि वर्ल्ड कपमधून बाहेर

| Updated on: Aug 31, 2023 | 8:55 AM

आशिया कप खेळण्याचा फायदा नक्कीच वर्ल्ड कपमध्ये होणार आहे. मात्र अनेक संघांच्या मागे दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. यामध्ये काही संघाचे प्रमुख खेळाडूंचाही समावेश आहे. अशातच एक खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे.

World Cup 2023 आधी टीमला मोठा धक्का, स्टार खेळाडू आशिया कप आणि वर्ल्ड कपमधून बाहेर
Follow us on

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेला आता सुरूवात झाली असून त्या पाठोपाठ ऑक्टोबर महिन्यात वर्ल्ड कपचा थररा रंगणार आहे.  आशिया कपच्या महासंग्रामाला सुरूवात झाली असून पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघान नेपाळवर 238 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. अशातच एक वाईट बातमी समोर आली असून  वर्ल्ड कप तोंडावर आला असताना संघाचा मोठा खेळाडू वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. संघासाठी हा मोठ धक्का मानला जात आहे.

कोण आहे तो खेळाडू?

यंदाचा वन डे वर्ल्ड कप भारतामध्ये होणार असून ऑक्टोबर महिन्यामध्ये थराराला सुरुवात होणार आहे. सर्व संघ तयारी करत असून आता आशिया कपमध्ये संघाची रंगीत तालीम होणार आहे. आशिया कप खेळण्याचा फायदा नक्कीच वर्ल्ड कपमध्ये होणार आहे. मात्र अनेक संघांच्या मागे दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. यामध्ये काही संघाचे प्रमुख खेळाडूंचाही समावेश आहे.

आता काही खेळाडू दुखापतीमधून सावरत आहेत. मात्र अशातच बांगलादेश संघाच स्टार खेळाडू इबादत हुसेन वर्ल्ड कप मधून बाहेर पडला आहे. इबादत हुसेनच्या दुखापतीचा बांगलादेश संघाला मोठा फटका बसणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून इबादत हुसेन खेळणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

इबादत हुसेन हा गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. गुडघ्यावर सर्जरी करण्यात येणार असून सर्जरीनंतर त्याला 3 ते 4 महिने महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे इबादत हुसेन याला वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेला मुकावं लागणार आहे.

दरम्यान, मागील महिन्यामध्ये अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेत त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली हेती. आशिया कपमधूनही त्याला माघार घ्यावी लागली आणि त्याच्या जागी तंजीम साकिबला स्थान देण्यात आलं आहे. तंजीम याने बांगलादेशकडून अजून पदार्पण केलं नाही. बांगलादेशसाठी दोन मोठे धक्के बसले आहेत. याआधी लिटन दास हा आशिया कपमधून बाहेर पडला होता.