मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील काही घटना या कायमस्वरूपी लक्षात राहणाऱ्या असतात. 1999 मध्ये उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेचा एका धावेने झालेला पराभव, 2011 मध्ये धोनीने मारलेला षटकार, तर 2019 वर्ल्डकपचा अंतिम फेरीचा सामना असं क्रीडाप्रेमींचा लक्षात राहतं. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट प्रकरण क्रीडाप्रेमींच्या लक्षात राहील यात शंका नाही. कारण अँजेलो मॅथ्यूजला बाद घोषित केल्याने आयसीसी नियमाची सर्वत्र चर्चा होत आहे. पंच मरायस इसरासमस यांच्याकडे अपील केल्यानंतर त्यांनी नियमानुसार आऊट असल्याचं घोषित केलं. या प्रकरणानंतर सर्वच फलंदाजांनी धसका घेतला आहे. इंग्लंड विरुद्ध नेदरलँड सामना सुरु आहे. ख्रिस वोक्ससोबत असंच काहीसं झालं. पण त्याने डोकं वापरलं आणि समस्या थेट पंचांसमोर मांडली.
इंग्लंडच्या डावात 36 व्या षटकात मोईन अली बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी ख्रिस वोक्स मैदानात उतरला. त्याने बेन स्टोक्सला उत्तम साथ दिली. पण मैदानात आल्यानंतर चेंडूचा सामना करण्यापूर्वी हेल्मेटमध्ये गडबड असल्याचं दिसून आलं. त्यानंतर तो थेट पंचाकडे गेला आणि हसतच वेळेबाबत विचारलं. आता या क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वोक्सने पंचांशी चर्चा केली नसती तर कदाचित मॅथ्यूजसारखीच परिस्थिती ओढावली असती.
Chris Woakes had some problems with his helmet, he showed it to umpires to not get 'timed out'. #ENGvsNED #WorldCup2023 pic.twitter.com/qOdHytY6iP
— tom jay (@tom_jay83359) November 8, 2023
Chris Woakes having problem with his helmet pic.twitter.com/14yQ5aZmkB
— गाभरु🚩 (@thoda_rude_hu) November 8, 2023
ख्रिस वोक्स आणि बेन स्टोक्स यांनी सातव्या गड्यासाठी 129 धावांची भागीदारी केली. ख्रिस वोक्सने 45 चेंडूत 51 धावा केलाय. तर बेन स्टोक्सने 84 चेंडूत 108 धावा केल्या. तसं पाहीलं तर या दोन्ही संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण चॅम्पियन ट्रॉफी 2025 साठी विजय खूपच महत्त्वाचा होता. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. 50 षटकात 9 गडी गमवून 339 धावा केल्या आणि विजयासाठी 340 धावा दिल्या. पण नेदरलँडचा संघ 179 धावांवर बाद झाला. इंग्लंडने नेदरलँडवर 160 धावांनी विजय मिळवला.
इंग्लंड : जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद
नेदरलँड्स : वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/विकेटकीपर), बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन