मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि इंग्लंडमधील सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने धावा केल्या 229 आहेत. इंग्लंडला जिंकण्यासाठी 230 धावांची गरज आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा याने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवनेही 49 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजी करत होता मात्र टॉप ऑर्डर फेल गेल्याने मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे आज इंग्लंडला लक्ष्याचा पाठलाग करण्यापासून रोखताना भारतीय गोलंदाजांची अग्निपरीक्षा असणार आहे.
भारतीय संघ पहिल्यांदाचा वर्ल्ड कपमध्ये सुरूवातीला बॅटींगला उतरला होता, मात्र निराशाजनक सुरूवात झाली. शुबमन गिल 9 धावांवर माघारी परतला, विराट कोहली आज भोपळाही फोडू शकला नाही. श्रेयस अय्यरलाही विकेटवर थांबता आलं नाही तोसुद्ध लवकर आऊट झाला. एका बाजूने विकेट पडत असताना रोहित शर्माने एक बाजू लावून धरली होती.
रोहित आणि राहुल यांची 91 धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली, मात्र राहुल मोठा फटका मारायला गेला आणि 39 धावांवर आऊट झाला. राहुल गेल्यावर रोहितही 87 धावांवर आऊट झाला. आज परत एकदा रविंद्र जडेजा फेल गेला मात्र सूर्यकुमार यादव याने 49 धावा करत भारताचा डाव सावरला. जसप्रीत बुमराहनेही चांगली साथ देत शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहिला आणि भारताला 225 धावांचा टप्पा पार करून दिला.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड