मुंबई : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यापासून वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या दोन्ही संघात 2019 वर्ल्डकपचा अंतिम सामना झाला होता. हा सामना इंग्लंडने चौकारांच्या आकडेमोडीवर जिंकला होता. आता पुन्हा हे दोन्ही संघ आमनेसामने उभे ठाकले आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांना जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दोन्ही संघ फॉर्मात असून वॉर्मअप सामन्यात त्याची छाप दिसून आली. न्यूझीलंडने आपले दोन्ही सराव सामने जिंकले, तर इंग्लंड 2 पैकी 1 सामना जिंकला आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. रद्द झालेला सामना भारताविरुद्ध होता. असं असलं तरी न्यूझीलंडची पहिल्या सामन्यात अडचण असल्याचं दिसून येत आहे. कारण केन विलियमसन आणि टिम साउदी खेळणं कठीण आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, केन विलियमसन दीर्घ दुखापतीतून सावरला आहे. पण इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. दुसरीकडे, टिम साउदी जखमी असून त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. पण नेटमध्ये तो सराव करत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कोण खेळणार आणि कोण नाही? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 95 वनडे सामने झाले आहेत. यात इंग्लंडने 45 आणि न्यूझीलंडने 44 सामने जिंकले आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ 10 वेळा आमनेसामने आले आहेत. यात 5 सामने न्यूझीलंडने, तर 5 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. भारतीय मैदानावर दोन्ही संघ एकदा आमनेसामने आले असून त्यात इंग्लंडने बाजी मारली आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघ 260 धावांपर्यंत मजल मारू शकतो. पण या मैदानात विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा रेकॉर्ड चांगला आहे. विजयी टक्केवारी ही 60 टक्के आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकला तर कर्णधार प्रथम गोलंदाजी करणं पसंत करेल.
न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे आणि इंग्लंडचा जो रूट हे दोघं कर्णधारपदाचे दावेदार ठरू शकतात. तर डेरिल मिचेल, जॉनी बेयरस्टो हे सामन्यात आपली छाप पाडू शकतात. तर बजेट पिकमध्ये सॅम करन, ग्लेन पिलिप्स योग्य ठरू शकतील.
लकी इलेव्हन 1 : डेव्हॉन कॉनवे (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (उपकर्णधार), जो रूट, डेविड मलान, डेरिल मिचेल, लियाम लिविंगस्टोन, सॅम करन, ट्रेंट बोल्ट, मार्क वूड
लकी इलेव्हन 2: जो रूट (कर्णधार), डेरिल मिचेल (उपकर्णधार), जॉनी बेयरस्टो, टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, डेविड मलान, बेन स्टोक्स, लियाम लिविंगस्टोन, सॅम करन, ट्रेंट बोल्ट, मार्क वूड
न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, टॉम लेथम, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, ईश सोढी, जिमी नीशम
इंग्लंड: जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, डेविड मलान, हॅरी ब्रूक, लियाम लिविंगस्टोन, जो रूट, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल रशीद, मार्क वुड, ख्रिस वोक्स