मुंबई : वन डे वर्ल्ड कप 2023 काही महिन्यांवर आला असुन त्यासाठी सर्व संघ तयारीला लागलेले दिसत आहेत. यंदाचा वर्ल्ड कप भारतामध्ये होणार असल्याने टीम इंडियाला प्रबळ दवेदार मानलं जात आहे. ऑक्टोबर महिन्यापासून वर्ल्ड कप थराराला सुरूवात होणार असून नोव्हेंबर महिन्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर फायनल सामना होणार आहे. अशातच ऑस्ट्रेलिया संघाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने वर्ल्ड कपबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
ग्लेन मॅकग्रा याने वर्ल्ड कपबाबत बोलताना, यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि पाकिस्तान हे चार संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील असं म्हटलं आहे. हे चारही संघ सेमी फायनलमध्ये का जातील याचं कारणही मॅकग्राने सांगितलं आहे.
ऑस्ट्रेलिया संघ मोठ्या स्पर्धांमध्ये ताकदीनिशी खेळतो, आताच्या संघात तसे अनुभवी खेळाडूी आहेत. ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियामध्ये वन डे मालिका होणार असल्याने त्याचासुद्धा ऑस्ट्रेलियाला फायदा होणार आहे. तर इंग्लंल सेमी फायनलमध्ये जाण्यामागे त्यांचा संघ गेले काही दिवसांपासून वन डे क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत असून त्यांचा संघसुद्धा संतुलित वाटत असल्याचं मॅकग्रा म्हणाला.
दरम्यान, तिसरा संघ टीम इंडिया आणि चौथा पाकिस्तान आहे, बाबर आझमच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानचा संघ आशिया खंडात सर्वोत्तम प्रदर्शन करत आहे. टीम इंडियासाठी हा वर्ल्ड कप आपल्या घरच्या मैदानावर खेळवला जात असल्याने त्याचा त्यांना मोठा फायदा होणार आहे, असंही ग्लेन मॅकग्राने सांगितलं.
ऑस्ट्रेलियाची 18 सदस्यीय वर्ल्ड कप टीम: पॅट कमिंस (कर्णधार), सीन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, एरॉन हार्डी, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, स्टीव स्मिथ , मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जाम्पा.