World Cup 2023 | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा केव्हा?

| Updated on: Aug 07, 2023 | 5:37 PM

आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे यंदा भारतात करण्यात आलं आहे. या वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

World Cup 2023 | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा केव्हा?
team india rohit sharma
Follow us on

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला आता 2 महिन्यांपेक्षा कमी कालावधी बाकी आहे. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. अशातच 10 संघ वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपसाठी 18 सदस्यीय संघही जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलिया टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया 18 मधून 15 खेळाडूंची वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात येणार आहे. दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार, याबाबतची तारीख समोर आली आहे.

वर्ल्ड कपसाठी एकूण 10 संघांनी खेळाडूंची नावं केव्हापर्यंत जाहीर करायची आहेत, यासाठी आयसीसीने अंतिम तारीख जाहीर केली आहे. आयसीसीने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, सर्व संघांना 28 सप्टेंबरपर्यंत आपल्या टीममधील खेळाडूंची नाव जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच 28 सप्टेंबरनंतरही टीममध्ये बदल करता येणार आहे. मात्र त्यासाठी आयसीसीची परवानगी घ्यावी लागणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी आशिया कपनंतर संघ जाहीर करण्याची शक्यता आहे.

टीम इंडिया वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना हा 8 ऑक्टोबरला खेळणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध असणार आहे. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर दुसरा सामना हा 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. तर टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला हा 15 ऑक्टोबरला पार पडणार आहे. हा हायव्होल्टेज सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. याच दरम्यान नवरात्री आहेत. त्यामुळे या सामन्याच्या तारखेत बदल होऊ शकतो.

त्यानंतर चौथा सामन्यात 19 ऑक्टोबरला बांगलादेशचं आव्हान असणार आहे. पाचव्या सामन्यात 22 ऑक्टोबरला न्यूझीलंड टीम इंडिया विरुद्ध भिडेल. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 29 ऑक्टोबरला खेळेल. हा सामान लखनऊमध्ये खेळवला जाईल.

त्यानंतर 2 नोव्हेंबरला टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका असणा सामना रंगणार आहे. 5 नोव्हेंबरला कोलकाता टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असेल. तर टीम इंडिया साखळी फेरीतील अखेरचा सामान हा 11 नोव्हेंबरला नेदरलँड विरुद्ध खेळेल.