मुंबई | आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेच्या 100 दिवसांआधी वेळापत्रक जाहीर केलं आहे. आयसीसीने ट्विटद्वारे हे वेळापत्रकाची माहिती दिली आहे. वर्ल्ड कप स्पर्धा 2023 एकूण 46 दिवस रंगणार आहे.
या 46 दिवसांमध्ये एकूण 45 सामने खेळवण्यात येणार आहेत. एकूण 13 शहरांमध्ये या वर्ल्ड कप सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्ड कपसाठी एकूण 10 संघ रॉबिन राउंड पद्धतीने खेळणार आहेत. त्यामुळे प्रत्येक टीम साखळी फेरीत इतर 9 संघाविरुद्ध 9 सामने खेळणार आहे. त्यानंतर सेमी फायनल आणि फायनलचं आयोजन होणार आहे.
आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये पावसाची एन्ट्री झाली आहे. या पावसामुळे अनेकदा सामने रद्द करावे लागतात. तसेच कधीकधी सामना सुरु व्हायला अनेक तासांची प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे आता वर्ल्ड कपमध्ये सामन्यादरम्यान पाऊस झाला तर काय होईल, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
वर्ल्ड कप स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. आयसीसीने साखळी फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवलेला नाही. त्यामुळे साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना समसमान पॉइंट्स देण्यात येतील.
तसेच पहिला सेमी फायनल सामना हा 15 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये पार पडेल. तर दुसऱ्या सेमी फायनलचं कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. या दोन्ही सेमी फायनल सामन्यांसाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. तसेच अंतिम सामना हा 19 नोव्हेंबरला होणार आहे. या महाअंतिम सामन्यासाठी 20 नोव्हेंबर राखीव दिवस आहे. महत्वाची बाब म्हणजे बाद फेरीतील सामने डे-नाईट पद्धतीने खेळवण्यात येणार आहेत.
या वनडे वर्ल्ड कपमधील सकाळच्या सामन्यांना 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर डे नाईट सामन्यांना दुपारी 2 वाजता सुरुवात होईल.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक
Proud moment for India! Hosting the ICC Men's Cricket World Cup for the fourth time is an incredible honor. With 12 cities as the backdrop, we'll showcase our rich diversity and world-class cricketing infrastructure. Get ready for an unforgettable tournament! #CWC2023 @ICC @BCCI pic.twitter.com/76VFuuvpcK
— Jay Shah (@JayShah) June 27, 2023
पहिला सामना कधी आणि केव्हा?
दरम्यान वनडे वर्ल्ड कप 2023 मधील सलामीचा सामना हा 5 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत.