मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात कठीण असा पेपर भारताने सोडवला आहे. रॉबिन राउंडमध्ये ऑस्ट्रेलियाचं मोठं आव्हान होतं. हा सामना जिंकला तर पुढचं गणित सोपं होणार हे याबाबत दुमत नाही. नाणेफेकीचा कौल जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी निवडली. भारतीय गोलंदाजांनी सर्वोत्तम खेळी करत ऑस्ट्रेलियाला 199 धावांवर रोखलं. तसेच विजयासाठी 200 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान सहजरित्या भारत पेलेल असं सुरुवातील वाटलं होतं. पण तीन खेळाडू खातं न खोलता तंबूत परतले आणि धाकधूक वाढली. विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या खांद्यावर मोठी धुरा होती. हा सामना गमावणं स्पर्धेत जर तर वर अवलंबून होण्यासारखं होतं. पण विराट आणि केएल राहुल यांनी संघाचा डाव सावरला आणि विजय मिळवून दिला. भारताने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्स राखून विजय मिळवला.
विराट कोहलीने फलंदाजीच नाहीत फिल्डिंगमध्येही योगदान दिलं. मिचेल मार्श याचा जबरदस्त झेल घेत ऑस्ट्रेलियाला कमी धावांवर रोखण्यात यश मिळवलं. यासाठी विराट कोहली याचा ड्रेसिंग रुमममध्ये सन्मान करण्यात आला. बीसीसीआयने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात विराट कोहली याला बेस्ट फिल्डर ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. फिल्डिंग कोच टी दिलीप याने गोल्ड मेडलने सन्मानित केलं.
टी दिलीप यांनी गोल्ड मेडल घालताच विराट कोहली याने राफेल नदालच्या शैलीत सेलिब्रेशन केलं. यावेळी ड्रेसिंग रुममध्ये सर्व खेळाडू उपस्थित होते. यावेळी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवत कौतुक केलं. यावेळी प्रशिक्षक राहुल द्रविड याने ड्रेसिंग रुममध्ये सर्वांना संबोधित केलं आणि सांगितलं की, “आजपासून एक छोटा बदल होत आहे. आज फिल्डिंग मेडल दिलं जात आहे.”
फिल्डिंग कोच टी दिलीप यांनी सांगितलं की, “हे मेडल इतर खेळाडूंना प्रेरित करणाऱ्या खेळाडूंना दिलं जाणरा आहे. अय्यरनेही पॅट कमिंस आणि एडम झम्पा यांचा जबरदस्त झेल घेतले.”