मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये आज न्यूझीलंड आणि भारत आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत चार सामने जिंकलेत. रोहित शर्माच्या बॅटींगने टॉप गिअर टाकला असून विरोधी संघाच्या प्रत्येक बॉलिंग युनिटवर त्याने हल्ला चढवला आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये भारताकडून रोहितने सर्वाधिक 265 धावा केल्या आहेत. मात्र आजच्या सामन्यात रोहित शर्मासाठी मोठं आव्हान असणार आहे. न्यूझीलंडच्या एका गोलंदाजासमोर रोहित फ्लॉप होत असल्याचं दिसत आहे. गेली 13 सामन्यांची आकडेवारी पाहिली तर तुमच्याही लक्षात येईल की हिटमॅनची त्या गोलंदाजाविरूद्ध बॅट शांत असते.
न्यूझीलंडच्या या गोलंदाजाविरूद्ध रोहित फेल गेलेला दिसला असून त्याच्यासमोर हिटमॅन जास्तवेळ तग धरू शकला नाही. इतकंच नाहीतर रोहितला त्याच्याविरूद्ध एक षटकारही मारता आला नाही. हा मॅचविनर बॉलर दुसरा तिसरा कोणी नसून ट्रेंट बोल्ट आहे. आकडेवारी पाहिली तर रोहितने गेल्या 13 सामन्यांमध्ये 137 बॉलमध्ये 89 धावा केल्या आहेत. यामध्ये चारवेळा बोल्टने रोहितला बाद केलं आहे. फुल फायरिंग करणारा रोहित आजच्या सामन्यामध्ये कसा खेळतो याकडे क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आजचा सामना धर्मशाला या मैदानावर होणार असून सामन्याला दुपारी 2 वाजता सुरूवात होणार आहे. भारताने वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड संघाला 20 वर्षांपूर्वी शेवटचं वर्ल्ड कपमध्ये पराभूत केलं होतं. त्यानंतर भारतीय संघाला किवींना वर्ल्ड कपमध्ये हरवण्यात यश आलं नाही. आजच्या सामन्यात रोहित शर्मा अँड कंपनीकडे मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, कुलदीप यादव