मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यामध्ये कुसल मेंडिस याने भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. भारताने श्रीलंकेला 358 धावांचं लक्ष्य दिलं आहे. भारताकडून शुबमन गिल 92 धावा, विराटक कोहली 88 धावा आणि श्रेयस अय्यरच्या आक्रमक 82 धावांच्या जोरावर भारताने 350 टप्पा पार केला. श्रीलंका संघाकडून दिलशान मदुशंका याने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. श्रीलंका लक्ष्याचा पाठलाग करत भारताचा विजयरथ रोखण्यात यशस्वी ठरतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आजच्या सामन्यात भारतीय संघाची सुरूवात खराब झाली होती, रोहित शर्मा पहिल्या ओव्हरच्याा दुसऱ्याच बॉलवर ४ धावांवर आऊट झाला होता. त्यानंतर विराट कोहली आणि शुबमन गिल यांच्या 189 धावांच्या भागीदारीने श्रालंकेला बॅकफूटला ढकललं. शुबमन आणि विराट आज शतक पूर्ण करणार असं वाटत होतं मात्र तसं काही झालं नाही. मधुशंकाने विराटला 88 तर गिलला 92 धावांवार माघारी पाठवलं.
दोघे बाद झाल्यावर श्रेयस अय्यर यान डावाची सूत्रे आपल्या हातात घेत लंकेच्या गोलंदाजांना घाम फोडला. अवघ्या 56 बॉलमध्ये 82 धावांची आक्रमक खेळी केली होती, या खेळीमध्ये त्याने सहा षटकार आणि तीन चौकार मारले.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W/C), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका