Ind vs Ban : वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजयी चौकार, विराटची विक्रमी शतकी खेळी!

| Updated on: Oct 19, 2023 | 10:20 PM

IND VS BAN World Cup 2023 : भारत आणि बांगलादेशमधील सामन्यात सात विकेट्सने भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने वर्ल्ड कपमधील सलग चौथा विजय साकारला आहे.

Ind vs Ban : वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजयी चौकार, विराटची विक्रमी शतकी खेळी!
Follow us on

पुणे : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये झालेल्या सामन्यामध्ये रोहित अँड कंपनीने 7 विकेटने विजय मिळवला आहे. बांगलादेशच्या 257 धावांचा पाठलाग करताना भारताने 42 व्या ओव्हरमध्ये हे आव्हान पूर्ण करत विजय साकारला. भारताच्या  लंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीनंतर विराट कोहली याच्या नाबाद 103 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने सलग चौथा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने पॉईंट टेबलमध्ये आपलं स्थान आणखी भक्कम केलं आहे.

भारताचा डाव

बांगलादेश संघाने दिलेल्या 257 धावांचा पाठालाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल मैदानात उतरले होते. रोहित शर्मा याने सुरूवातीपासून बांगलादेशच्या गोलंदाजीची पिसे काढायला सुरूवात केली. रोहित आणि शुबमन यांनी 88 धावांची सलामी केलेली. रोहित 48 धावांवर असताना मोठा फटका मारण्याच्या नादात आऊट झाला. रोहितनंतर शुबमन गिल याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि मोठा फटका मारण्याच्या नादात 53 धावांवर आऊट झालेला.

गिल गेल्यानंतर श्रेयस अय्यर आलेला मात्र तो अवघ्या १९ धावांवर माघारी परतला. दुसरीकडे विराट कोहलीने एक बाजू लावून धरली होती. सुरूवातीला मिळालेल्या फ्री हिटचा फायदा घेत त्याने जो मोसम पकडला तो थेट विक्रमी शतक करत सामना जिंकूनच थांबला. अवघ्या 97 चेंडूत 103 धावांची खेळी केली यामध्ये 6 चौकार आणि 4 षटकार मारले.  विराट कोहली याने वैयक्तिक 48 वं शतक केलं असून सर्वाधिक शतके करण्यापासून आता तो एक शतक दूर आहे. सचिन तेंडुलकर याचा सर्वाधिक 49 शतकांचा विक्रम आहे.

दरम्यान, विराट कोहली याने फक्त शतकालाचा नाहीतर आपल्या आंतरराष्ट्रीय 26,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. 567 डावांमध्ये विराटने ही कामगिरी केली आहे तर सचिनने 600 डावांमध्ये हा कामगिरी केली होती. या सामन्यामध्ये विराटला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद,  नजमुल हुसेन शांतो (C), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (Wk), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम