मुंबई : वर्ल्ड कप 2023मधील भारत आणि बांगलादेश सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यामध्ये विजय मिळवत भारतीय संघ चौथ्या विजयासाठी उत्सुक असणार आहे. पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र असोसिएशन स्टेडियममध्ये सामना पार पडत आहे. सामना सुरू झाला असून बांगलादेश संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सामन्यामध्ये टीमला मोठा झटका बसला आहे.
भारत- बांगलादेश संघाच्या सामन्यात बांगलादेशचा संघ त्यांच्या मुख्य कर्णधाराशिवाय उतरली आहे. बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन या सामन्यामध्ये खेळताना दिसणार नाही. बांगलादेश संघाचा हुमकी एक्का असलेला शाकिब दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यामध्ये त्याला दुखापत झाली होती.
बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब एकटा वन मॅन आर्मीसारखा असून संघासाठी जशी गरज तशी कामगिरी त्याने केली आहे. महत्त्वाचं म्हणजे शाकिब भारताविरूद्ध चांगलं प्रदर्शन करतो त्यामुळे तो संघात नसण्याने बांगलादेशला तोटा होणार आहे. बॉलिंग, बॅटींग आणि फिल्डिंग तिन्हीमध्ये गडी आपले १०० टक्के देतो त्यामुळे संघाला फायदा होतो. कित्येकदा तर त्याने संघाला एकट्याच्या जोरावर सामने जिंकून दिले आहेत.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (C), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (Wk), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम