मुंबई : आशिया कप 2023 महासंग्रामाला आजपासून सुरूवात होणार आहे. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ या दोन संघांमध्ये होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. आशिया कपला आज सुरूवात होत असली तरी खरी सुरूवात ही 2 सप्टेंबरला होणार आहे. कारण टीम इंडियाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत होणार आहे. हाय व्होल्टेज सामन्याची क्रेज जगभरात आहे. हा सामना सोडाच 14 ऑक्टोबरला होणाऱ्य भारत-पाक सामन्याची ती तिकिटे अवघ्या तासात विकली गेलीत.
आशिया कपनंतर वर्ल्ड कपमध्ये भारत-पाक आमनेसामने येणार आहे. वर्ल्ड कप भारतामध्ये होणार असल्याने प्रत्येक चाहत्याला हा सामना पाहायचा आहे. या सामन्याची तिकिटांच्या बुकिंगसाठी आयीसीसीने बुकिंग भागादारी असलेल्या ‘BookMyShow’ ने विशेषे प्री-सेल विंडो ओपन केल्यानंतर अवघ्या तासाभरात सर्व तिकिटे विकली गेलीत.
मंगळवारी ‘BookMyShow’ ने 14 ऑक्टोबरच्या सामन्याच्या तिकिटांसाठी प्री-सेल विंडो उघडण्यात आली होती. मात्र अवघ्या तासाभरात सर्व तिकिटांचा कार्यक्रम आटोपला. संध्याकाळी सहा वाजता प्री-सेल विंडो ओपन केल्यावर अवघ्या तासाभरात सर्व तिकिटांची विक्री झाली. याबाबत अधिकृत अशी माहिती देण्यात आलेली नाही पण चाहत्यांनी तिकिटे बुक करता आली नसल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.
आता अशी माहिती समजत आहे की, 3 सप्टेंबरला अशी दुसरी फेरी होणार असून त्यावेळी जास्त प्रमाणात तिकिटांची विक्री करण्याता येणार आहेत. भारत-पाक हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणार आहे.
दरम्यान, या स्टेडियममध्ये एकावेळी 1,32,000 चाहते सामना पाहू शकतात. सेमी फायनल आणि फायनल सामन्यांसाठी एका व्यक्तीला दोन तिकिटे घेता येणार आहेत. त्यासोबतच टीम इंडियाच्या सामन्यांची एका व्यक्तीला दोन तिकिटे मिळणार आहेत. तर इतर संघाच्या सामन्यांची एक व्यक्तिला चार तिकिटे घेता येणार आहेत.