मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 33 वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये दोन्ही संघ आमनेसामने येत आहे. यापूर्वी 2011 च्या वर्ल्डकप फेरीच्या अंतिम सामन्यात दोन संघ याच मैदानावर भिडले होते. तेव्हा भारताने श्रीलंकेला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. नुकत्याच झालेल्या आशिया कप अंतिम फेरीतही भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 167 वनडे सामने झाले आहेत. त्यात भारताने 98, तर श्रीलंकेने 57 सामन्यात विजय मिळवला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत हे दोन्ही संघ 8 वेळा आमनेसामने आले आहेत. यात 4 वेळा भारताने, 4 वेळा श्रीलंकेने विजय मिळवला आहे.
मुंबईचं वानखेडे स्टेडियम फलंदाजीसाठी पुरक आहे. त्यामुळे या मैदानावर धावांचा वर्षावर होईल. काही अंशी वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार धावांचा पाठलाग करणं पसंत करेल. ही खेळपट्टी 70 टक्के वेगवान, तर 30 टक्के फिरकीपटूंना मदत करेल.
कर्णधार म्हणून रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह योग्य ठरतील. तर कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा आणि मोहम्मद शमी पॉइंट्स गणित जुळवून आणू शकतात. धनंजय डिसिल्वा, दिलशान मदुशंका आणि कुलदीप यादव बजेट प्लेयर्स ठरतील.
ड्रीम इलेव्हन 1 : रोहित शर्मा (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), सदीरा समरविक्रमा, शुबमन गिल, विराट कोहली, रवींद्र जडेजा, धनंजय डिसिल्वा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, दिलशान मदुशंका.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर/इशान किशन, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
श्रीलंका : पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (कर्णधार/विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महेश थेक्षाना, कसून राजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका.