मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सेमी फायनल सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या म्हणजेच बुधवारी 15 नोव्हेंबरला पार पडणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाचा पराभव करत भारतीय संघाचे शिलेदार 2019 चा बदला घेण्याच्या तयारीमध्ये असतील. या सामन्याआधी टीम इंडियालाच मोठा झटका बसणार असल्याचं दिसत आहे. कारण भारताच्या वेगवान गोलंदाजांमधील स्टार गोलंदाज या सामन्याला मुकणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या त्रिमूर्तींमधीलच एक आहे. नेदरलंँडविरूद्धच्या सामन्यात मोहम्मद सिराज याला झेल घेताना मोठी दुखापत झालेली. त्यावेळी त्याला चालू सामन्यात मैदान सोडून बाहेर बसावं लागलं होतं. काही वेळाने तो परतला होता मात्र बुधवारी होणाऱ्या सामन्यामध्ये त्याच्या खेळण्याबाबत साशंकता निर्माण केली जात आहे.
मोहम्मद सिराज याला दर दुखापतीमुळे बाहेर बसावं लागलं तर एका स्टार खेळाडूची संघात एन्ट्री होणार आहे. तो स्टार खेळाडू म्हणजे आर. अश्विन असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात होताना दिसत आहे. जर तीन वेगवान गोलंदाज खेळवायचे झाल्यास टीम मॅनेजमेंटसमोर प्रसिद्ध कृष्णा हासुद्धा एक पर्याय उपलब्ध असणार आहे. अनुभव पाहता अश्विनला संधी द्यावी तर संघात तीन स्पिनर आणि दोन वेगवान गोलंदाज राहतील. त्यामुळे नक्की काही सांगता येत नाही.
वर्ल्ड कप साठी टीम इंडियाचा संघ: रोहित शर्मा (C), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, प्रसिद्ध कृष्णा , श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद . सिराज, मो. शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर.