मुंबई : आयसीसीने वर्ल्ड कप 2023 ला काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. आयसीसीकडून सर्व देशांना आपले वर्ल्ड कपसाठीचे संघ जाहीर करण्याची आज (5 सप्टेंबर) अंतिम तारीख आहे. (Kane Williamson Fitness Update) सर्व संघाना 5 सप्टेंबरला आपला संघ जाहीर करायचा आहे. त्यानंतर 28 सप्टेंबरपर्यंत काही बदल करायचा असेल तर तुम्ही करू शकता. अशातच एका संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शांंत स्वभाव, कोणताही उतावळेणा नाही, शांत डेक्याने सगळी गणिते करणार कर्णधार परतलाय. त्यामुळे इतर संघांसाठी धोक्याचीच घंटा म्हणावी लागेल.
वर्ल्ड कप 2023 तोंडावर आला सर्व देशांच्या टीमने संघ बांधणीला सुरूवात केली आहे. यंदाचा वन डे वर्ल्ड कप भारतात असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. त्यामुळे सर्व संघांनी आपल्या मुख्य खेळाडूंना रेडी ठेवलं आहे. वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेसाठी मोठे खेळाडू नेहमी संघासाठी फायद्याचे ठरतात. अशातच सर्व गोलंदाजांचा काळ असल्याप्रमाणे आपल्या फलंदाजीच्या जोरावर सामने पालटवले आहेत.
वन डे क्रिकेटमध्ये गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणारा हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन आहे. केन हा असा फलंदाज आहे जो कोणत्याही परिस्थितीमध्ये संघासाठी महत्त्वाची खेळी करू शकतो. केनच्या नेतृत्त्वाखाली 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड संघाने फायनलपर्यंत धडक मारलेली. मात्र इंग्लंडकडून त्यांच्या फायनल सामन्यामध्ये पराभव झाला होता. त्यानंतर पहिला कसोटी वर्ल्ड कपसुद्धा न्यूझीलंड संघाने केनच्या नेतृत्त्वाखालीच जिंकला होता.
दरम्यान, आयपीएलच्या 2022 च्या हंगामामध्ये केनला फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. ही दुखापत केनला चांगलीच महागात पडली. मार्च महिन्यापासून केन क्रिकेटपासूव दूर आहे. त्यामुळे त्याला वर्ल्ड कपसाठी खेळायचं असेल तर लवकरात लवकर फिट व्हायला सांगितलं होतं. आता केन फिट झाला असून लवकरच तो पुन्हा एकदा क्रिकेटच्य मैदानात परतणार आहे.