World Cup 2023 : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ‘हा’ खेळाडू असणारा ‘युवराज’; 2011 वर्ल्ड कप संघाची निवड करणाऱ्या खेळाडूंचं मोठं वक्तव्य!

| Updated on: Jun 28, 2023 | 9:24 PM

सर्वांना महेंद्र सिंग धोनीचा सिक्सर माहित आहे. पण मालिकावीर ठरलेल्या युवराज सिंगने आपल्या बॅट आणि बॉलिंगने कमाल केली होती. 2011 मध्ये जे काम युवराज सिंगने केले होतं ते काम आताच्या संघामधील हा एक खेळाडू करू शकतो.

World Cup 2023 : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये हा खेळाडू असणारा युवराज; 2011 वर्ल्ड कप संघाची निवड करणाऱ्या खेळाडूंचं मोठं वक्तव्य!
युवराज सिंह याने गिलच्या पोस्टवर कमेंट करत, तू आजचा सामना सहज जिंकून देऊ शकत होता. मात्र चुकीच्या शॉटमुळे तू आऊट झाला असं युवराज म्हणाला.
Follow us on

मुंबई : टीम इंडियाने 2011 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली दुसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. सर्वांना महेंद्र सिंग धोनीचा सिक्सर माहित आहे. पण मालिकावीर ठरलेल्या युवराज सिंगने आपल्या बॅट आणि बॉलिंगने कमाल केली होती. युवराजने त्यावेळी प्रत्येक सामन्यामध्ये आपली छाप पाडली होती. अशातच टीम इंडियाकडे आता दुसरा युवराज सिंग असल्याचं वक्तव्य माजी कर्णधार आणि 2011 मध्ये भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते कृष्णमामचारी श्रीकांत यांनी केलं आहे.

भारतामध्ये  फिरकीपटूंना चांगली मदत मिळते, पिचवर चांगला टर्न मिळतो. इथे  इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारखी परिस्थिती नाही. भारत घरच्या मैदानावर खेळत असडल्याने त्याचा संघाला फायदा होणार असल्याचं श्रीकांत म्हणाले. 2011 मध्ये भारतीय संघ एकदम शानदार होता आणि महत्त्वाचं त्या टीममध्ये युवराज सिंह असल्याचंही श्रीकांत यांनी म्हटलं आहे.

कोण आहे तो खेळाडू?

2011 मध्ये जे काम युवराज सिंगने केले होतं ते काम यंदाच्या वर्षी रविंद्र जडेजा करू शकतो. त्यासोबतच जडेजाशिवाय एक खेळाडू आहे तो म्हणजे अक्षर पटेल असल्याचं श्रीकांत यांनी सांगितलं.

टीम इंडियाने 10 वर्षानंतर एकही ICC ट्रॉफी जिंकलेली नाही.  2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली त्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. पण यानंतर भारताला पुन्हा कोणत्याही फॉरमॅटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनता आले नाही.

तो 2021 आणि 2023 मध्ये दोनदा ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला पण तो जिंकू शकला नाही. 2014 मध्येही धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने T20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता पण श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता.