World Cup 2023 टीम इंडियामधून 2 खेळाडूंचा पत्ता होणार कट, मोहम्मद कैफने सांगितली नावं!

| Updated on: Sep 05, 2023 | 9:21 AM

Mohammad Kaif on World Cup 2023 : टीम इंडियाने आपल्या संघाची काही घोषणा केली नाही. याच पार्श्वभूमीवर माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने वर्ल्ड कप संघामधून दोन खेळाडूंना संघातून डच्चू दिला जावू शकत असल्याचं म्हटलं आहे. 

World Cup 2023 टीम इंडियामधून 2 खेळाडूंचा पत्ता होणार कट, मोहम्मद कैफने सांगितली नावं!
Follow us on

मुंबई : आशिया कप 2023 मध्ये टीम इंडियाने नेपाळविरूद्ध पहिला सामना जिंकत विजयाचा श्रीगणेशा केला. सुपर 4 मध्ये प्रवेश केल्यानंतर टीम इंडियाला आशिय कप जिंकण्यासाठी सज्ज झाली. वर्ल्ड कप तोंडावर आला असताना आशिया कपमुळे रंगीत तालीम होत आहे. वर्ल्ड कप ऑक्टोबर महिन्यात सुरू होत असून त्यासाठी काही संघांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. अद्याप टीम इंडियाने आपल्या संघाची काही घोषणा केली नाही. याच पार्श्वभूमीवर माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने वर्ल्ड कप संघामधून दोन खेळाडूंना संघातून डच्चू दिला जावू शकत असल्याचं म्हटलं आहे.

कोण आहेत ते दोन खेळाडू?

श्रीलंकेमधील पल्लेकले या ठिकाणी टीम इंडिया आणि नेपाळचा सामना पार पडला. या सामन्यानध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. यावेळी समालोचनादरम्यान बोलताना, वर्ल्ड कप संघाची घोषणा झाल्यावर त्यामध्ये आशिया कपचाच संघ असेल फक्त यामधील प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा यांना संघातून बाहेर काढलं जाईल, असं मला वाटत असल्याचं कैफ म्हणाला.

शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यावर दबाव असणार, जर त्यांच्य परफॉर्मन्स खालावला तर त्यांच्या जागेवर नवीव पर्याय पाहिला जावू शकतो. के. एल. राहुल फिट असेल तर त्याला संघातच नाहीतर प्लेइंग 11 मध्ये जागा मिळेल. प्रसिद्ध कृष्णाला आताच्या दोन्ही सामन्यांमध्ये संधी मिळालेली नाही. तिलक वर्मालासुद्धा अद्याप वन डेमध्ये पदार्पण करू शकला नाही.

दरम्यान, सूर्यकुमार हा वनडे मध्ये चालत नसला तरी त्याला टी-20 संघातून बाहेर काढण कठीण आहे. तो एक मॅचविनर खेळाडू असून आयपीएलमध्ये त्याची कामगिरी दर्जेदार आहे. वनडे क्रिकेटमध्ये सूर्या फ्लॉप जात असला तरी त्याला संघातून बाहेर काढण कठीण आहे, असं मोहम्मद कैफ म्हणाला.

रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन(W), हार्दिक पांड्या (उप-कप्तान), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा