Asia Cup 2023 : शिपायापेक्षा नेपाळच्या क्रिकेटपटूंना कमी पगार, आकडा ऐकून हैराण व्हाल?

| Updated on: Aug 30, 2023 | 1:46 PM

Nepal Asia Cup : आशिया कपच्या महासंग्रामाला आजपासून सुरूवात होणार आहे. यंदाच्या कपमध्ये प्रथमच नेपाळ संघाने स्थान मिळवलं आहे. नेपाळी खेळाडूंचा पगार ऐकून तुम्हालाही धक्कास बसल्याशिवाय राहणार नाही.

Asia Cup 2023 : शिपायापेक्षा नेपाळच्या क्रिकेटपटूंना कमी पगार, आकडा ऐकून हैराण व्हाल?
Follow us on

मुंबई : आशिया कप 2023 च्या थराराला आजपासून सुरूवात होणार आहे. नेपाळ आणि पाकिस्तानचा पहिला सामना होणार आहे. नेपाळ संघाने प्रथमच आशिया कपचं तिकिट बुक केलं आहे. पात्र फेरीमध्ये नेपाळच्या खेळाडूंनी युएई संघाचा पराभव केलेला. आता नेपाळ संघ भारत-पाकिस्तानसारख्या तगड्या संघासोबत दोन हात करताना दिसणार आहे. मात्र नेपाळच्या खेळाडूंचा पगार एकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. क्रिकेट खेळात पाण्यासारखा पैसा ओतला जातो, भारतीय खेळाडूंना कोटी आणि लाखांमध्ये पैसे आहेत. त्या तुलनेत नेपाळच्या खेळाडूंचा पगार चाय कम पाणी आहे.

नेमका किती भेटतो पगार?

नेपाळ क्रिकेट बोर्डसुद्धा बीसीसीआयप्रमाणे खेळाडूंना तीन श्रेणींमध्ये विभागतो आणि त्यानुसार खेळाडूंना पगार देतं. नेपाळच्या A श्रेणीमधील खेळाडूंना दरमहिन्याला ६० हजार रूपये, B श्रेणीमध्ये असणाऱ्या खेळाडूंना 50,000 तर C श्रेणीमध्ये येणाऱ्या खेळाडूंना 40,000 इतका पगार आहे.  पगार तर ठिकठाक आहे पण नेपाळच्या चलनाची भारतामध्ये किंमत कमी होते. नेपाळच्या ज्या खेळाडूला 60,000 पगार आहे त्याची भारतामध्ये 37,719, तर 50000 नेपाळी रुपयांचे भारतामध्ये 31,412 इतकी किंमत आहे. ज्या खेळाडूंचा पगार 40000 इतकी आहे त्याची भारतीय चलनामध्ये 25 हजार आहे.

नेपाळच्या खेळाडूंना करार सोडून एका वन डे सामन्यात 10000 रूपये मानधन असतं. तर टी-20 क्रिकेटच्या सामन्याचं 5000 इतकं मानधन आहे. दोन्ही मानधन भारतीय चलनानुसार एका वन डेसाठी 6286 आणि टी-20 सामन्यासाठी 3143 इतकं मानधन मिळतं.

दरम्यान, पोरांना पैसा कमी आहे परंतु त्यांनी आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर पात्रता फेरीमधून आशिया कपमध्ये आपलं तिकिट बुक केलं.  आजचा पहिलाच सामना पाकिस्तानसोबत तर दुसरा सामना टीम इंडियासोबत आहे. आशिया कप जिंकण्यासाठी त्यांना तगड्या संघाना पराभूत करावं लागणार आहे. पहिल्या सामन्यात कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आशिया कपसाठी बांगलादेशचा संघ:-
शकीब अल हसन (कर्णधार), नजमुल हुसेन, तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शोरफुल इस्लाम, नसुम अहमद, शाक मेहेदी हसन, नईम शेख, शमीम हसन, शमीद हसन तमीम, तनझिम हसन साकिब आणि अनामूल हक बिजॉय