मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यात सामना होत आहे. या दोन्ही संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे या दोन्ही संघांचे पुढील सर्व सामने औपचारिक आहेत. बांगलादेश आणि नेदरलँडसाठी या सामन्यातील विजय प्रतिष्ठेचा आहे. या व्यतिरिक्त दुसरं असं काही सांगता येणार नाही. नेदरलँडने नाणेफेकीचा कौल जिंकत 50 षटकात सर्व गडीबाद 229 धावा केल्या. बांगलादेशसमोर विजयासाठी 230 धावांचं आव्हान ठेवलं आहे. नेदरलँडकडून वेसले बरेसी आणि स्कॉट एडवर्ड्स यांनी चांगली खेळी केली. या व्यतिरिक्त कोणता खेळाडू काही खास करू शकला नाही. बांगलादेशच्या गोलंदाजांनी धावसंख्या रोखून धरली. त्यामुळे कमी धावा असल्याने बांगलादेशचा संघ ही धावसंख्या आरामात गाठेल अशी शक्यता क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.
नेदरलँडची धावसंख्या 4 असताना दोन धक्के बसले. विक्रमजीत सिंग आणि मॅक्स ओडाऊड हा स्वस्तात बाद झाला. व्रिकमजीत याने 3, तर मॅक्स ओडाऊड याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर वेसले बरेसीने डाव सावरला. त्याला कोलिन अकरमॅनची साथ मिळाली. पण बरेसी 41 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर स्कॉट एडवर्ड्स धीम्या गतीने धावा करत संघाला सावरलं. 89 चेंडूत 68 धावा केल्या. या व्यतिरिक्त मोठी धावसंख्या उभारण्यात इतर फलंदाजांना अपयश आलं.
बांगलादेशकडून शोरिपुल इस्लाम याने 2, तस्किन अहमद याने 2, मुस्तफिझुर रहमान याने 2, महेदी हसन याने 2 आणि शाकिब अल हसन याने 1 गडी बाद केला.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम.
नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडाऊड, वेस्ली बरेसी, कॉलिन अकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/विकेटकीपर), बास डी लीडे, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.