World Cup 2023 Point Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडने केली दोन गुणांची कमाई, उपांत्य फेरीचं गणित समजून घ्या

| Updated on: Oct 05, 2023 | 11:00 PM

World Cup 2023 Point Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला पराभूत केलं. या इंग्लंडला पराभूत करत न्यूझीलंडने 2 गुणांची कमाई केली आहे. तसेच रनरेटही चांगला आहे.

World Cup 2023 Point Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडने केली दोन गुणांची कमाई, उपांत्य फेरीचं गणित समजून घ्या
World Cup 2023 Point Table : इंग्लंडला पराभूत करत न्यूझीलंडने कमावले दोन गुण, नेट रनरेटमुळे उपांत्य फेरीसाठी होणार फायदा
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून न्यूझीलंडने विजयी सलामी दिली. न्यूझीलंडने इंग्लंडचा 9 गडी राखून पराभव केला. इंग्लंडने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 282 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान न्यूझीलंडने 1 गडी गमवून पूर्ण केलं. त्यामुळे जेतेपदाच्या शर्यतीत न्यूझीलंड असेल अशी जोरदार चर्चा रंगली आहे. मागच्या 4 वर्ल्डकपमध्ये तीच टीम चॅम्पियन बनली आहे. ज्या संघाच्या खेळाडूंनी स्पर्धेत पहिलं शतक ठोकलं आहे. असं गेल्या 16 वर्षापासून म्हणजेच 2007 पासून सुरु आहे. वर्ल्डकप 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून रिकी पाँटिंगने शतक ठोकलं होतं. त्यानंतर 2011 मध्ये वीरेंद्र सेहवाग, 2015 मध्ये ऑरोन फिंच आणि 2019 मध्ये जो रूटने शतक ठोकलं होतं. त्यामुळे न्यूझीलंड यावेळीचा वर्ल्डकप जिंकेल असं गणित बांधलं जात आहे.

न्यूझीलंडकडून पहिल्याच सामन्यात रचिन रविंद्र आणि डेवॉन कॉनव्हे यांनी शतक ठोकलं. डेवॉन कॉनव्हे याने 121 चेंडूत 152 धावा केल्या. तर रचिन रविंद्र याने 96 चेंडूत 123 धावांची खेळी केली. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 273 धावांची भागीदारी केली.  न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करत दोन गुणांची कमाई केली आहे. इंग्लंडचा कठीण पेपर सोडवल्याने पुढील स्पर्धा हळूहळू सोपी होत जाणार आहे. ही स्पर्धा रॉबिन राउंड पद्धतीने होणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला प्रत्येकी 9 सामने खेळायचे आहेत. 7 सामने जिंकेल तो संघ उपांत्य फेरीत जागा मिळवणार आहे. न्यूझीलंडचा पुढचा सामना नेदरलँडशी होणार आहे.

संघ सामने विजय पराभव गुणनेट रनरेट
भारत77014+2.102
दक्षिण अफ्रिका76112+2.290
ऑस्ट्रेलिया75210+0.924
न्यूझीलंड8448+0.398
पाकिस्तान8448+0.036
अफगाणिस्तान7438-0.330
श्रीलंका
7254-1.162
नेदरलँड्स7254-1.398
बांगलादेश7162-1.446
इंग्लंड7162-1.504

न्यूझीलंडने इंग्लंडला 9 विकेट्स आणि 13.4 षटकं राखून जिंकला. त्यामुळे न्यूझीलंडला नेट रनरेटमध्ये मोठा फायदा झाला आहे. तसेच या सरासरीचा फायदा पुढे स्पर्धा सरकेल तशी होईल. न्यूझीलंडचा नेट रनरेट +2.149 इतका आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट