मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता हळूहळू रंगतदार वळणावर येत आहे. पहिल्या टप्प्यातील दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामना पार पडला. दक्षिण आफ्रिकेने 428 धावांचा डोंगर रचला आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी 429 धावांचं आव्हान दिलं. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 10 गडी गमवून 326 धावा करू शकला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 102 धावांनी जिंकला. त्यामुळे पॉइंट टेबलवर मोठा फरक पडेल असं वाटलं होतं पण तसं झालं नाही. कारण श्रीलंकेनं चिवट झुंज दिल्याने नेट रनरेटवर फरक दिसून आला. दक्षिण आफ्रिकेने 2 गुणांची कमाई केली खरी पण दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात पहिल्या टप्प्यातील शेवटचा सामना असेल. यावरून पहिल्या टप्प्यात कोणता संघ वरचढ ते कळून येईल.
न्यूझीलंडचा संघ 2 गुण आणि +2.19 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ 2 गुणांसह +2.040 रनरेटसह दुसऱ्या, पाकिस्तान 2 गुणांसह +1.620 नेट रनरेटसह तिसऱ्या आणि बांगलादेश 2 गुणांसह +1.438 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडने इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने सर्वात शेवटच्या स्थानावर आहे.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
उपांत्य फेरीत टॉप 4 वर असलेले संघच धडक मारणार आहेत. त्यामुळे गुणांसह नेट रनरेटही महत्त्वाचा ठरणार आहे. जसजशी स्पर्धा रंगत जाईल तसतसं यात बदल दिसून येईल. उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रत्येक संघाला किमान 7 सामने जिंकणं गरजेचं आहे. पण सामन्यात काही उलटफेर झाले तर गुण समान होतील. अशा वेळी नेट रनरेट महत्त्वाचा ठरणार आहे.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): कुसल परेरा, पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शानाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, दिलशान मदुशंका, कसून राजितहा.